शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

कोरड्या खोकल्याने हैराण केलंय?; उपाय तर तुमच्या स्वयंपाक घरातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 14:42 IST

वातावरण बदलत असून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. दिवसभर उन तर सकाळी आणि संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.

वातावरण बदलत असून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. दिवसभर उन तर सकाळी आणि संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. अशातच या बदलत्या वातावरणात लोक सर्दी आणि खोकला, गळ्यामध्ये होणारी खवखव, ताप यांसारख्या समस्यांनी हैराण होतात. काही लोकांना तर जरा वातावरणात बदल झाला तर लगेच समस्या जाणवते. कफमुळे झालेला खोकला असेल तर तो लवकर बरा होण्यास मदत होते. परंतु, जर कोरडा खोकला असेल तर मात्र सहजासहजी पाठ सोडत नाही. खोकून खोकून छातीणध्ये दुखू लागतं, जळजळ होते पण हा खोकला काही थांबायचं नाव घेत नाही. आज आम्ही कोरडा खोकल्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने त्यापासून सुटका करणं सहज शक्य होईल. 

कोरडा खोकला काय आहे? 

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, सर्दी-खोकला होणं आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण यामुळे श्वसननलिका स्वच्छ होण्यास मदत होते. जेव्हा सर्दी-खोकला होतो त्यावेळी कफ, धूळ, इतर अस्वच्छ घटक निघून जातात. पण असं असलं तरिही खोकल्याकडे दुर्लक्षं करणं अत्यंत घातक ठरू शकतं. कोरड्या खोकल्यामुळे घशामध्ये खवखव होणं, छातीत जजळ होणं यांसारख्या समस्या उद्भवतात. जर तुम्हाला दोन ते तीन आठवड्यांपर्यंत सतत कफ किंवा कोरडा खोकला असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरड्या खोकल्याकडे दुर्लक्षं केलं तर इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. 

कोरड्या खोकल्यामुळे होणाऱ्या गंभीर समस्या... 

जर तुम्ही बरेच दिवस कोरडा खोकल्याकडे दुर्लक्षं करत असाल तर तुम्हाला नाकाची अॅलर्जी, क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज, टीबी, अॅसिडिटी, अस्थमा यांसारख्या समस्या होऊ शकतात. कोरड्या खोकल्याच्या सामान्य कारणांपैकी अस्थमा, गॅस्ट्रोसोफेजिअल रिफ्लक्स डिजीज, पोस्टनॅसल ड्रिप आणि इतर वायरल इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतो. 

कोरड्या खोकल्यामध्ये ट्राय करा हे घरगुती उपाय... 

तुळस ठरते फायदेशीर... 

तुळशीच्या पानांचा वापर करून तुम्ही कोरड्या खोकल्यापासून सुटका करू शकता. काही पानं पाण्यामध्ये उकळून घ्या. गरज असेल तर यामध्ये थोडीशी साखर एकत्र करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी हा काढा प्या. तसेच तुम्ही चहामध्ये तुळशीची पानं एकत्र करू शकता. 

मधामुळे मिळतो आराम... 

कोरड्या खोकल्यावर मध अत्यंत फायदेशीर ठरतं. मध लाळ ग्रंथी अॅक्टिव्ह करतो. त्यामुळे लाळे निर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरू होते. यामुळे घशातील खवखव दूर होते आणि खोकला कमी होतो. मध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. एक चमचा मधामध्ये आलं आणि डाळिंबाचा रस एकत्र करा. याच्या सेवनाने कोरडा खोकला कमी होतो. 

आलंही ठरतं गुणकारी... 

आल्याचा वापरही कोरड्या खोकल्यावर गुणकारी ठरतो. सर्दी-खोकला झाल्यावर अनेक लोक आल्याच्या चहाचे सेवन करतात. कोरडा खोकला झाल्यावर आल्याचं सेवन खोकल्याची तीव्रता कमी करतो. हे एक कप पाण्यामध्ये एकत्र करून गॅसवर थोड्या वेळासाठी उकळत ठेवा. हे पाणी दिवसभरात थोडं थोडं करून प्या. कोरडा खोकला दूर करण्यासाठी उत्तम उपाय आहे. 

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध एक औषधी वनस्पती आहे. जी कफ दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मुलेठीमध्ये अॅन्टी-इफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे खोकल्यामुळे होणारी जळजळ कमी करतात. एक कप गरम पाण्यामध्ये दोन चमचे ज्येष्ठमध एकत्र करा. 15 मिनिटांसाठी उकळत ठेवा. दिवसभर याचं सेवन करा. यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते. 

सफरचंदाचं व्हिनेगर 

सफरचंदाचं व्हिनेगर आरोग्यासाठी हेल्दी असतं. हे पचनक्रिया सुरळीत करतं. कोरडा खोकल्याची समस्या ठिक करण्यासाठी दोन चमचे सफरचंदाचं व्हिनेगर हलक्या गरम पाण्यामध्ये एकत्र करा. यामध्ये एक चमचा मध एकत्र करून दिवसभरात दोन ते तीन वेळा प्या. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार