शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जेवताना पाणी पिण्याची सवय अशी पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 10:56 IST

नुकत्याच एका संशोधनातून हे समोर आले आहे की, जेवताना पाणी पिणे आरोग्यासाठी फारच घातक आहे. 

(Image Credit : doctorstime.com)

मुंबई : अनेकांना जेवण करताना पाणी पिण्याची सवय असते. तर काही लोक हे जेवण झाल्याझाल्या ढसाढसा पाणी पितात. तुम्हालाही ही सवय असेल तर ही सवय वेळीच बदला. नुकत्याच एका संशोधनातून हे समोर आले आहे की, जेवताना पाणी पिणे आरोग्यासाठी फारच घातक आहे. 

अनेकजण पिझ्झा, भटूरे, बरगर खातांना सॉफ्ट ड्रिंक पितात. त्यांना असं वाटतं की, असे केल्यास त्याना ते पदार्थ डायजेस्ट होतील. पण असा विचार करणे चुकीचे आहे. याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. 

जेवण करताना पाणी प्यायल्यास शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. जेवताना पाणी प्यायल्यास शरीरातील इन्सुलिनचा स्तर वाढतो. याने पचनक्रियेवर प्रभाव पडतो. जेवताना पाणी प्यायल्यास अन्न पचनाची प्रकिया हळुवार होते. याने पोटाचे विकार होतात. 

आपण जे खातो त्यावर जठारात पचनक्रिया होते. जठराग्नी ही खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नी ही पचनक्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदाने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे. 

पाणी प्यायल्याने ही जठराग्नी समाप्त होते. ही जठराग्नी जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. त्याने एक दुष्टचक्र सुरू होते. महर्षि वाघभट्ट यांनी १०३ रोगांचा उल्लेख केला आहे. जे भोजन केल्यानंतर पाणी प्यायल्याने होतात. 

या गोष्टींची घ्या काळजी

1) जेवण करताना अधिक तिखट किंवा मसालेदार पदार्थ खात असाल तर थोडं पाणी प्यावे. 

2) जर जेवण केल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होणार नाही. 

3) जेवण योग्य प्रकारे चावून खाल्लास पचन चांगलं होतं. 

4) जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाआधी भरपूर पाणी प्यावे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य