शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Pregnancy Care Tips : गरोदरपणात कॉफीचं सेवन करणं बाळासाठी असं पडू शकतं महागात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 17:10 IST

Pregnancy Care Tips : सगळ्यांनाच कॉफी किंवा चहा पिण्याची  सवय असते.

(image credit- romper)

सगळ्यांनाच कॉफी किंवा चहा पिण्याची  सवय असते. कारण चहा प्यायल्यानंतर ताजेतवाने झाल्यासारख वाटत असतं. पण तुम्हाला हे माहित आहे का जर गरोदरपणात बाळाच्या आईने कॉफीचं सेवन केलं तर आईच्या तसंच बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.  महिलांना गरोदर असताना डोहाळे लागतात त्यावेळी त्यांना कोणतेही पेय पिण्याची इच्छा होऊ शकते. काही जणांना कॉफी प्यायला आवडतं असतं. कॉफीचे जास्त सेवन गरोदर असताना केले तर बाळाच्या अवयवांवर परिणाम होतो. गरोदरपणात केले जाणारे कॅफिनचे सेवन याबाबत रिसर्च करण्यात आला आहे. 

सगळ्यात आधी हा रिसर्च उंदरांवर करण्यात आला. पिल्लाला जन्म देणार असलेल्या उंदराला कॅफिन देण्यात आले.  त्यामुळे ताण- तणाव वाढल्यामुळे हार्मोन्समध्ये बदल झाला. त्यामुळे  जन्माला आल्यानंतर  पिल्लाचे वजन कमी झालेले दिसून आले.  तसंच लिव्हरच्या विकासात अडथळा निर्माण झाला. जर्नल ऑफ एंडोक्रिनोलॉजी यात प्रकाशित करण्यात आलेल्य रिसर्चनुसार २- ३ कप कॉफी प्यायल्याने  हार्मोन्सचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते.

कॅफिनच्या सेवनाचा परीणाम बाळाच्या लिव्हरवर होत असतो.  या रिसर्चमधून असं दिसून आलं की गरोदरपणात कॅफिनचे सेवन केल्यामुळे  ताण-तणाव वाढून बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो.  गरोदरपणात कॅफिन चे सेवन केल्यास फॅटि लिव्हर हे आजारपण वाढण्याचा धोका असतो.  तसंच  बाळाचं वजन कमी  होण्याची शक्यता असते. 

(Image credit- boston university)

तज्ञांच्या म्हणण्यानुसार गरोदरपणात कॉफिचं सेवन केल्यास आरोग्यासाठी घातक ठरतं. पण गरोदरपणात वेगवेगळ्या बदलामुळे  अनेक पदार्थ खावेसे वाटत असतात. त्यावेळी काही महिलांना कॉफी पिऊन आराम मिळतो. कॅफिनच्या सेवनानाने  तुमच्या झोपेवर सुद्दा परिणाम होतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. 

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीHealthआरोग्यpregnant womanगर्भवती महिला