शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Health tips: किडनी स्टोनच्या समस्येवर 'हे' ज्युसेस आहेत अत्यंत फायदेशीर, आजच प्यायला सुरुवात करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:10 IST

किडनी स्टोनच्या समस्येवर काही घरगुती उपाय करू शकता. त्याची माहिती येथे देत आहोत.

किडनी स्टोन ही एक वेदनादायक समस्या आहे. त्याचा त्रास कोणालाही होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत याला नेफ्रोलिथियासिस (Nephrolithiasis) किंवा युरोलिथियासिस (Urolithiasis) असेही म्हणतात. किडनी स्टोन (Kidney Stones) म्हणजे खनिजं आणि क्षारांनी बनलेले कठीण पदार्थ असतात. अनियंत्रित आहार, वाढलेलं वजन, एखादा रोग, काही सप्लिमेंट्स किंवा औषधं यांमुळे किडनी स्टोन होऊ शकतो. किडनी स्टोन तुमच्या मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत आपला डाएट प्लॅन खूप विचारपूर्वक आखावा लागतो. किडनी स्टोनची समस्या असेल तर काही घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीने हा त्रास कमी होऊ शकतो. यासंबंधीची सविस्तर माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे. किडनी स्टोनच्या समस्येवर काही घरगुती उपाय करू शकता. त्याची माहिती येथे देत आहोत.

लिंबाचा रसलिंबू हे पोटाच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी उपयुक्त ठरते. लिंबामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असतं. तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर लिंबाच्या रसाचं सेवन केल्यास तुमचा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. यानंतर चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि याचं सेवन करा. त्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरअ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये (Apple Cider Vinegar) अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड असतं. ते अ‍ॅसिड किडनी स्टोन विरघळण्यास मदत करतं. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर किडनी स्टोनमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करू शकतं. यासाठी शुद्ध पाण्यात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळून हे मिश्रण दिवसभर प्यावं. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर किडनी स्टोनची निर्मिती कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचं एका अभ्यासात आढळलं आहे; मात्र त्यावर सखोल संशोधन झालेलं नाही.

टोमॅटोचा रसकिडनी स्टोन शरीरातून बाहेर काढण्यासाठी टोमॅटोचा रसदेखील (Tomato juice) उपयुक्त आहे. यासाठी दोन टोमॅटो चांगले धुऊन बारीक करून घ्या. त्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पावडर मिसळून त्याचं सेवन करा. तुम्ही हे मिश्रण तयार करून फ्रीजमध्येदेखील साठवून ठेवू शकता. हवं असेल तेव्हा रस स्वरूपात याचं सेवन करावं.

ओवाओव्याचा रस किडनी स्टोनच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास उपयुक्त ठरतो. बऱ्याच काळापासून पारंपरिक औषधांमध्ये ओव्याचा वापर जातो. ओवा पाण्यात मिसळून तयार झालेल्या रसायनाचं दिवसभर सेवन करावं. हे मिश्रण शरीरात साचलेली घाण बाहेर काढण्यास मदत करतं.

तुळशीची पानंकिडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांपासून बनवलेला रस उपयुक्त ठरतो. तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात एक चमचा मध घालावा. या तयार केलेल्या मिश्रणाचे सकाळी आणि संध्याकाळी सेवन करावं. असं केल्याने किडनीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स