शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
3
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
4
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
5
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
6
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
7
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
8
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
9
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
10
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
11
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
12
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
13
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
14
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
15
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
16
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
17
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
18
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
19
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   

Corona Vaccination: ...म्हणून लस घेतल्यानंतरही होते कोरोनाची लागण; तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 12:50 IST

dr sanjay oak explains Why people are getting COVID 19 even after getting vaccinated: डॉ. संजय ओक यांनी सांगितलं लस घेतल्यानंतरही कोरोना होण्यामागचं कारण

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची संख्या महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. मागील ४ दिवस देशात दिवसाकाठी दीड लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १ लाख ८४ हजार ३७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. (dr sanjay oak explains Why people are getting COVID 19 even after getting vaccinated)कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार? अखेर उत्तर मिळालं; तुम्हालाही वाटेल दिलासाएका बाजूला देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. मात्र लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी यामागची काही महत्त्वाची कारणं सांगितली आहेत. 'कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही लागण होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. एखाद्या व्यक्तीनं कोरोनाची लस घेतली, त्यावेळी त्याला लक्षणं दिसत नव्हती. पण ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्या व्यक्तीनं लस घेतल्यावर लक्षणं स्पष्टपणे दिसू लागली. अशा वेळी चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह येणारच,' असं ओक यांनी सांगितलं....तेव्हाच रेमडेसिविरचा वापर करावा; कोविड टास्क प्रमुखांची हात जोडून कळकळीची विनंतीकोरोना लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होते. यामागे प्रामुख्यानं दोन शक्यता आहेत. 'तुम्ही कोरोना चाचणी केलेली नव्हती. तुम्ही लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर लक्षणं दिसली म्हणून तुम्ही आरटीपीसीआर केलं आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही एक शक्यता. तर कोरोना लस घेतल्यानंतर तुमचं शरीर विषाणूला प्रत्युत्तर देतं, ते प्रत्युत्तर पॉझिटिव्ह टेस्टच्या माध्यमातून तुमच्या निदर्शनास आलं, ही दुसरी शक्यता,' असं ओक म्हणाले. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यावरही कोरोना होऊ शकतो. पण तो सौम्य स्वरुपाचा असतो. कारण तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्या विषाणूचा मुकाबला करतात, असं ओक यांनी सांगितलं.देशात कोरोनाची दुसरी लाट असताना भारतासाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारला मोठा दिलासाकोरोनाची लस घेतली तरीही कोरोना होतोच. मग लस कशासाठी घ्यायची, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नालाही डॉ. ओक यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी स्वत:चं उदाहरण दिलं. 'मला जून जुलैमध्ये तीव्र स्वरुपाचा कोरोना झाला. त्याचं स्वरुप गंभीर होतं. त्यानंतर जानेवारीत मी लसीचा पहिला डोस घेतला. दोन महिन्यांनी दुसरा डोज घेतला. कालच मी माझ्या अँटिबॉडीज तपासल्या. त्या २५० पेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ माझ्या शरीरात प्रतिकारशक्ती आहे. माझ्या शरीरातील अँटिबॉडीज कोरोनापासून माझं रक्षण करतीलच असं नाही. पण मला गंभीर स्वरुपाचा कोरोना होणार नाही. झालाच तरी त्याचं स्वरुप सौम्य असेल,' असं डॉ. ओक म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस