शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बॉडी बनवण्याच्या नादात दूधासोबत केळी चुकूनही खाऊ नये, पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 11:56 IST

आयुर्वेदानुसार त्या पदार्थांसोबत दूध प्यायल्यास पचनासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेशी निगडीत समस्या होतात. केळी आणि दूधात पोषक तत्व भरपूर असतात.

दूधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही दुस-या पदार्थांसोबत दूध पिण्याचे काही दुष्परिणामही आहेत. आयुर्वेदानुसार त्या पदार्थांसोबत दूध प्यायल्यास पचनासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेशी निगडीत समस्या होतात. जे लोक बॉडी बनवण्याच्या प्रयत्नात असतात, त्यांना ब-याचदा केळी आणि दूध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशा आणखी काही गोष्टी आहेत ज्या दूधासोबत खाऊ नये. 

1) केळीसोबत

तुम्ही जिमला जाणा-यांना तुम्ही अनेकदा केळीसोबत दूधाचे सेवन करताना पाहिले असेल. पण दूधासोबत केळी किंवा ताक पिणे घातक ठरु शकतं. यामुळे पचनप्रक्रिया बिघडू शकते आणि शरीरात टॉक्सिन वाढण्याची शक्यता असते. यासोबतच तुम्हाला सर्दी-खोकला आणि अॅलर्जीची समस्याही होऊ शकते. 

2) मासे आणि दूध

चुकूनही मास्यांसोबत दूध घेऊ नये किंवा मासे खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये. असे सांगितले जाते की, मासे खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास चेह-यावर पांढरे डाग येतात. तसेच अॅसिडीटी आणि ओकारीची समस्याही होते. 

3) आंबट फळासोबत

आयुर्वेदानुसार, दूध आणि फळांचं एकत्र सेवन करु नये. कारण दूध एक लॅक्सेटिव्ह आहे. त्यासोबतच फळे पचायला हलके असतात आणि दूध पचायला वेळ लागतो. यामुळे तुम्हाला पोट दुखी आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

4) या गोष्टींची घ्या काळजी

आयुर्वेदानुसार, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट यांचं एकत्र सेवन करु नये. दूधासोबत केळी खाल्ल्यास कफ होण्याची शक्यता आहे. यासोबतच यांच्या एकत्र सेवनाने पचनक्रियेवर परिणाम होतो. अनेकांना तुम्ही दूधासोबत ब्रेड-बटर खातांना पाहिले असेल, पण यामुळे जडपणा वाटू शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य