शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

"४ ते ६ वेळेत काहीच खाऊ नका", न्यूट्रिशनिस्टनी सांगितला हेल्दी राहण्याचा खास सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 09:59 IST

Health Tips : न्यूट्रिशनिस्ट प्रशांत देसाई यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत एक खास सल्ला दिला.

Health Tips : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. लोकांनी एक रूटीन बनवून ठेवलं आहे. बरेच लोक सकाळी लवकर उठतात. एक्सरसाइज करतात, पौष्टिक नाश्ता करतात, ऑफिसला जातात, दुपारी जेवण करतात. काही लोकांचं सगळं काही असं सेट असतं. पण हेच लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे निरोगी राहण्यासाठी त्यांनी केलेली ही सगळी मेहनत वाया जाते. ती कशी वाया जाते ही आज आपण जाणून घेणार आहोत. 

न्यूट्रिशनिस्ट प्रशांत देसाई यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत एक खास सल्ला दिला. ते म्हणाले की, "बरेच लोक आजकाल निरोगी आणि फीट राहण्यासाठी अनेक गोष्टी करतात. वेळेवर नाश्ता, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणं सगळंकाही. पण यात ते एक चूक करतात ती म्हणजे ४ ते ६ या वेळेत ते काहीतरी खातात. या वेळेत जर तुम्ही काहीही खाल्लं तर तुमचं दिवसभराचं डिसिप्लीन सगळं वाया जातं. या वेळेत ही चूक करणं तुमच्या आरोग्यासाठी महागात पडू शकते. जास्तीत जास्त लोक या वेळेत ऑफिसमध्ये किंवा घरीही चहा बिस्कीट, समोसे, सॅंडविच असे काही पदार्थ खातात. त्यानंतर रात्रीच जेवण आणि नंतर लेट नाइट काही खाणं. मग झोपणं. हे फार चुकीचं रूटीन आहे". 

त्यांनी पुढे सांगितलं की, "जंक किंवा फास्ट फूड खाण्याऐवजी तुम्ही ३.३० वाजता एक ग्लास पाणी प्या किंवा लिंबूपाणी प्या. तरीही तुम्हाला भूक लागली असेल तर काही ड्राय फ्रुट्स खाऊ शकता. तरीही भूक गेली नसेल तर मग प्रोटीन शेक घेऊ शकता. या गोष्टी तुम्हाला हेल्दी ठेवू शकतात. त्यामुळे ४ ते ६ या वेळेत कधीही इतर काही खाऊ नका". 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य