कुत्र्यांचा धुमाकुळ- जोड-२

By Admin | Updated: February 22, 2016 00:03 IST2016-02-22T00:03:03+5:302016-02-22T00:03:03+5:30

मानसिकता बदलल्याने घेतात चावा...

Dogs Smoky Pair -2 | कुत्र्यांचा धुमाकुळ- जोड-२

कुत्र्यांचा धुमाकुळ- जोड-२

नसिकता बदलल्याने घेतात चावा...
सध्या वातावरण बदलून ऊन तापू लागल्याने कुत्रे आरामासाठी थंड जागा शोधतात. ती त्यांना मिळत नाही. त्यात या दिवसांमध्ये बांधकाम वाढलेले असते, त्यामुळे खुल्या जागा, अडगळीच्या जागा कुत्र्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची मानसिकता बदलते. तसेच कुत्र्यांचा हा प्रजनन काळही असतो. या दोन्ही कारणांमुळे कुत्रे चिडचिडे होतात व ते चावा घेतात, असे पशु तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांचे निर्बिजीकरण हाच उपाय असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोट...
सध्या ऊन तापू लागल्याने त्याचा ताण व सध्या कुत्र्यांचा प्रजनन काळही असतो. त्यामुळे त्यांचा ताण वाढून त्यांची मानसिकता बदलते व ते चिडचिडे होतात. त्यामुळे ते चवताळून चावा घेतात.
-डॉ.व्ही.टी. राईकवार, जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Dogs Smoky Pair -2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.