कुत्र्यांचा धुमाकुळ, एकाच दिवसात १७ जणांना चावा

By Admin | Updated: February 22, 2016 00:04 IST2016-02-22T00:04:06+5:302016-02-22T00:04:06+5:30

जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ कमी न होता दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. रविवारी तर एकाच दिवसात १७ जणांना कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. यामध्ये चार बालकांचा समावेश आहे. याबाबत मनपाच्या वतीने उपाययोजना सुरू असल्याचा दावा मनपा अधिकारी करीत असले तरी कुत्र्यांचा उच्छाद थांबत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

Dogs smash, bite 17 people in a single day | कुत्र्यांचा धुमाकुळ, एकाच दिवसात १७ जणांना चावा

कुत्र्यांचा धुमाकुळ, एकाच दिवसात १७ जणांना चावा

गाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ कमी न होता दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. रविवारी तर एकाच दिवसात १७ जणांना कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. यामध्ये चार बालकांचा समावेश आहे. याबाबत मनपाच्या वतीने उपाययोजना सुरू असल्याचा दावा मनपा अधिकारी करीत असले तरी कुत्र्यांचा उच्छाद थांबत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
शहरात सध्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यावर उपाय योजना करताना याला आळा बसण्याऐवजी त्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

एकाच दिवसात १७ जणांना चावा
रविवार, २१ फेब्रुवारी रोजी तर कुत्र्यांनी कहर केला. एकाच दिवसात १७ जणांना चावा घेतला. यामध्ये रिया दिलीप चांदेलकर (साडे तीन वर्ष, रा. जोशी पेठ), अनिल हरचंद जाधव (३२, जोशी पेठ), आशा डिगंबर कुळकर्णी (५०, खोटेनगर), बाळू सांडू तांबोळी (६०, रा. विटनेर), तानकाबाई बाबुलाल राठोड (६५, रा. हिंगणे, ता. जामनेर), अमर सुनील पाटील (११, जळगाव), इंदूबाई सीताराम लढे (७३, रा. जळगाव), मोहन बळीराम आपोतीकर (४०, रा. अकोला), महेश पाटील (६, रा.शिवकॉलनी), प्रकाश सुरेश फुसे (५०, रा. शिरसोली), जगन्नाथ चिंधू जगदाळे (७०, रा. जळगाव), सुधाकर विष्णू चौधरी (३५, जळगाव), खालीद शेख चांद (१०, रा. गेंदालाल मिल), लक्ष्मीबाई बळीराम कासार (७०, संभाजीनगर), राजाराम शंकर सपकाळे (४५, रा. खोटेनगर), तेजस संतोष चौधरी (११, रा. गारखेडा), राजवीर अविनाश नेतले (४, रा. राजीव गांधी नगर) यांना रविवारी कुत्र्यांनी आपले लक्ष्य केले. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

नागरिक भयभीत...
दिवसेंदिवस वाढणार्‍या कुत्र्यांच्या धुमाकुळामुळे शहरवासीय भयभीत झाले असून कुत्रा दिसताच सर्वजण दचकत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या भागात फिरताना दिसत आहे. हे कुत्रे दुचाकींचाही पाठलाग करीत असल्याने त्यांच्यापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वार वेगाने वाहन नेतात व त्यामुळे अपघातदेखील होत आहे. अनेक ठिकाणी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवितानाही घाबरत असून खेळण्यासाठी त्यांना घराबाहेरदेखील पाठवित नसल्याचे चित्र आहे. शिवाय मोठी व्यक्ती व वृद्धांच्या मनातही कुत्र्यांची मोठी दहशत पसरली आहे.

Web Title: Dogs smash, bite 17 people in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.