मनपा आयुक्तांच्या घराच्याच सुरक्षा रक्षकाला कुत्र्याचा चावा
By Admin | Updated: December 19, 2015 00:19 IST2015-12-19T00:19:43+5:302015-12-19T00:19:43+5:30
जळगाव : शहरातील कुत्र्यांचा धुमाकूळ व शहरवासीयांना कुत्र्याचा चावा हा गंभीर विषय बनला असताना यातून महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षकही सुटला नाही. या सुरक्षा रक्षकाला शुक्रवारी बंगल्यातीलच पाळीव कुत्र्याने चावा घेतला.

मनपा आयुक्तांच्या घराच्याच सुरक्षा रक्षकाला कुत्र्याचा चावा
ज गाव : शहरातील कुत्र्यांचा धुमाकूळ व शहरवासीयांना कुत्र्याचा चावा हा गंभीर विषय बनला असताना यातून महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षकही सुटला नाही. या सुरक्षा रक्षकाला शुक्रवारी बंगल्यातीलच पाळीव कुत्र्याने चावा घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. मनपाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे. मात्र त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. असे असताना आता मनपाचे आयुक्तांच्या बंगल्यावर कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक भिमराव गोबा सोनवणे (६५,शिवाजीनगर) यांना बंगल्यातीलच पाळीव कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन उपचार घेतले. कसा बंदोबस्त होणार?...शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ज्या मनपावर आहे, त्या मनपाच्या अधिकार्यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकच कुत्र्यांपासून सुरक्षित नसतील, तर शहरवासीयांची मोकाट कुत्र्यांपासून कशी सुटका होईल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.