शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

गव्हामुळे केस गळतात का? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 10:36 IST

गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्हा चर्चेत आहे.

डॉ. रचिता धुरत, त्वचारोग विभागप्रमुख, सायन रुग्णालय

गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्हा चर्चेत आहे. जिल्ह्यातील काही गावांमधील लोकांचे केस अचानक  गळायला लागले. या वृत्ताला देशपातळीवर प्रसिद्धी मिळाली. संशोधकांचे पथक गावांमध्ये पोहोचले. पंजाब आणि हरयाणा येथील गहू  रेशनिंग स्वरूपाने बुलढाणा जिल्ह्यांतील काही गावांमध्ये वितरित केला गेला. त्यातील सेलेनियम या खनिजाच्या अतिप्रमाणामुळे केसगळती  झाल्याचे संशोधनाअंती स्पष्ट झाले. 

सेलेनियम हा पाण्यात आणि अन्य काही पदार्थांमध्ये आढळणारा घटक असून, त्यामुळे निश्चितच तो अतिरिक्त प्रमाणात आढळल्याने केसाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्याचा थेट परिणाम म्हणजे केस गळणे हा होय. त्यामुळे केसाच्या वाढीवर परिणाम होतो. यामुळे केस हळूहळू गळू लागतात. मात्र, काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. ते म्हणजे हा गहू ज्या सर्व ठिकाणी गेला आहे, त्यांचेसुद्धा केस गळाले आहेत का? हे पाहणे गरजेचे आहे. 

त्याबरोबरच जिथे हा केसगळतीचा प्रश्न उपस्थित झाला तिथेच मूतखड्याचेही प्रमाण  वाढीस लागल्याचे आढळून आले. सेलेनियम खनिजाचा हा प्रभाव होता, हे यातून स्पष्ट झाले. 

गळतीचे दोन प्रकार

जिथे सेलेनियमची बाधा झाली तेथील पाण्यात क्षार, शिसे आढळून येते.  बुलढाणाच्या रुग्णांमध्ये कसे केस गळालेत ते पाहणे गरजेचे आहे. 

केस गळतीतही काही प्रकार आहेत. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. ॲनाजेन इफ्लुव्हियम आणि टेलोजन इफ्लुव्हियम. ॲनाजेन इफ्लुव्हियममध्ये केस वाढीच्या अवस्थेत केस गळून पडतात. केसांचा पुंजका निघून काही दिवसांत टक्कल पडते. तर टेलोजन इफ्लुव्हियम ताणतणाव, हॉर्मोन्स बदल किंवा टप्प्याटप्प्याने केस गळतात. 

केस पुन्हा येतात 

सेलेनियममुळे केसगळती झाली असली आणि पूर्णपणे टक्कल पडले असले तरी नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी सेलेनियम स्रोत आहे हे कळून आले असेल त्या गोष्टी बंद करणे गरजेचे आहे. कालांतराने तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्णपणे केस येतात. त्यासाठी विषारीपण असलेले कोणतेही खाद्यपदार्थ आणि पाणी पिऊ नये किंवा त्याचा वापर करू नये. 

केसगळती थांबविण्याकरिता पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे असणारा आहार घ्यावा. सोबत ताणतणाव कमी करत योग आणि व्यायाम करावा.

विषाक्तता हे कारण आहे का? 

सेलिनिअमसोबत अन्य काही हानिकारक खनिजेसुद्धा या ठिकाणच्या पाण्यात आढळून आली आहेत. त्यामुळे गव्हातील सेलिनिअम आणि पाण्यात आढळून येणाऱ्या अन्य धातूंमुळे केसगळती झाली आहे का, हे तपासणेसुद्धा गरजेचे आहे. त्यासोबत ज्या पाण्याने भाज्या धुतल्या जातात त्यामध्येसुद्धा सेलिनिअम, क्षार जात आहेत का हेसुद्धा बघितले पाहिजे. मानवाचा थेट संबंध असलेल्या कुठल्याही पदार्थातील विषारीपण हे केसाच्या आरोग्याला हानिकारकच आहे. 

त्यासोबत जंतुनाशके कोणत्या प्रकारची किती प्रमाणात वापरली आहेत त्याचा खाद्यपदार्थांवर थेट काही परिणाम होतो याचा उलगडा होणे आवश्यक आहे. 

केसगळतीची सर्वसाधारण कारणे?

प्रदूषण, भेसळयुक्त खाद्यपदार्थ, पाण्यातील विषारीपण, काही वेळा आनुवंशिक, असंतुलित हार्मोन्स, जीवनसत्त्वाची कमतरता, ऑटोइम्युन आजार.   

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स