(Image Credit : 9Coach - Nine)
उन्हाळ्याला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी हा फेव्हरेट काळ आहे. कारण अनेक लोकांना असं वाटतं की, गरमीमुळे जास्त घाम आल्याने वजन कमी करण्यास मदत होते. या वातावरणात अनेक जिम ट्रेनरही हे सांगतात असतील की, याचा वातावरणात तुम्ही वजन कमी करु शकता. इतकेच काय तर अनेक फिटनेस ट्रेनर्स हे लोकांना फॅन बंद करुनही वर्कआउट करण्यास सांगतात, जेणेकरुन जास्त घाम यावा. पण खरंच जास्त घाम येण्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते का?
जर असं असेल तर हिवाळ्यात तुमच्या शरीरातून अजिबातच फॅट बर्न होत नसेल. कारण हिवाळ्यात अजिबातच घाम येत नाही. या लॉजिकनुसार डोंगराळ भागात किंवा थंड ठिकाणांवर राहणाऱ्या लोक जाडेपणाचे शिकार व्हायला पाहिजेत. कारण त्या ठिकाणांवर फार घाम येत नाही. तसेच एका सामान्य धारणा अशी आहे की, हिवाळ्यात तुमचं वजन वाढतं आणि उन्हाळ्यात कमी होतं.
काय सांगतं सायन्स?
आपल्या शरीरात एडिपोज टिशूच्या रुपात फॅट(चरबी) जमा होते. जेव्हाही शरीराची एनर्जी गरज बाहेरुन पूर्ण होत नाही तेव्हा शरीर या जमा झालेल्या फॅटला एनर्जी मध्ये बदलतं आणि आपण फॅट कमी करतो. तुम्ही हिवाळ्यात वर्कआउट करा किंवा उन्हाळ्यात शरीरातून फॅट बर्न होण्याची प्रक्रिया एकसारखीच आहे.
घामाच्या रुपात फॅट बाहेर येतं?
असं अजिबात होत नाही. शरीराचं तापमन संतुलित करण्यासाठी घाम येतो. उन्हाळ्यात बाहेरचं तापमान इतकं जास्त असतं की, शरीराला थंड ठेवण्यासाठी खूप जास्त घाम येतो. तेच हिवाळ्यात जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा शरीरातील तापमान कमी करण्यासाठी घाम येतो.
काय उन्हाळ्यात वजन वाढतं?
वजन वाढणं हे वातावरणावर नाही तर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर अवलंबून असतं. जेव्हा तुमच्या खाण्यात कॅलरीचं प्रमाण फार जास्त असतं तेव्हा कॅलरी फॅट स्वरुपात शरीरात जमा होतात आणि जाडेपणा वाढतो. जेव्हा शरीरात कॅलरी कमी होतात तेव्हा शरीरातील फॅट एनर्जी होऊन निघून जातं आणि याने वजन कमी होतं.