शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Video - जास्त घाम आल्यावर वजन लवकर कमी होतं?; डॉक्टरांनी सांगितलं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 14:46 IST

उन्हाळ्यात व्यायाम न करता देखील शरीराला खूप घाम येत असतो. मग अशावेळी घाम आल्यानंतर खरचं वजन कमी होतं का? हा प्रश्न पडतो. याबाबत सत्य काय ते जाणून घेऊया.

व्यायाम करताना शरीराला जितका जास्त घाम येईल तितक्या वेगाने तुमचे वजन कमी होईल असं सामान्यतः लोकांचा समज असतो. कधी कधी जिम ट्रेनरदेखील असंच सांगतात. पण अनेकदा उन्हाळ्यात व्यायाम न करता देखील शरीराला खूप घाम येत असतो. मग अशावेळी घाम आल्यानंतर खरचं वजन कमी होतं का? हा प्रश्न पडतो. याबाबत सत्य काय ते जाणून घेऊया.

डॉ. मनन वोहरा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडिओच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. घाम गाळून वजन कमी करण्याची कल्पना पूर्णपणे चुकीची आहे आणि या चुकीच्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवू नये. त्यांनी ही बाब मनातून काढून टाकावी, असं म्हटलं आहे.

डॉक्टरांच्या मते, घाम येणं हे शरीराचं एक कार्य आहे ज्याद्वारे शरीरातील घाण बाहेर निघून जाते आणि तापमान नियंत्रित करता येतं. जेव्हा तुम्ही हाय इंटेन्सिटी वर्कआउट करता तेव्हा शरीर गरम होतं आणि मग जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा तुम्हाला थोडासा थंडावा जाणवतो. घाम आल्यावर ज्या कॅलरीज बर्न होतात, त्या फक्त स्वेट ग्लँडच्या फंक्शनला मदत करतात. 

वजन कमी करण्यासाठी काय करावं?

1. अन्न, भाज्या आणि हेल्दी फॅट्स असलेल्या संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा.2. तुमचे मानसिक आरोग्य आणि स्ट्रेस लेव्हलची काळजी घ्या.3. नियमितपणे व्यायाम करा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगवर लक्ष द्या.4. दररोज रात्री सात ते नऊ तासांची चांगली झोप घ्या. कमी झोप तुमच्या मेटाबॉलिज्मला डिस्टर्ब करू शकते आणि अनहेल्दी फूड्सचं क्रेविंग वाढू शकतं. 

वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही हे लक्षात ठेवा. चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी लाँग टर्म सॉल्यूशनवर लक्ष द्या. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdoctorडॉक्टर