Fasting Ageing : जसजसं वय वाढत जातं, तसतशी लोकांना म्हातारणाची चिंता सतावत असते. बऱ्याच लोकांना हेच वाटत असतं की, त्यांनी नेहमीच तरूण दिसावं. त्यांचं आयुष्य वाढावं. अनेकांना १०० वर्ष आयुष्य जगण्याची ईच्छा असते. अनेक असेही देश आहेत जिथे लोकांचं सरासरी वय १०० पेक्षा जास्त असतं. आयुष्य कसं वाढवावं? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. अशात अमेरिकेच्या मियामी शहरात राहणारे डॉक्टर रवि के. गुप्ता यानी आयुष्य वाढवणाऱ्या टिपबाबत सांगितलं आहे.
डॉ. रवि गुप्ता एक हेमाटोलॉजी ऑनकोलॉजीचे एक्सपर्ट आहेत. यांचं मत आहे की, उपवास म्हणजेच फास्टिंग केल्यानं तरूण बनता येऊ शकतं आणि हे जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वत:वरच टेस्ट केली. टेस्टनंतर त्यांचं बायोलॉजिकल वय कमी झालं.
वय वाढतं राहणं हा तर निसर्गाचा नियम आहे. वेळ कुणासाठीही थांबत नसते. तुम्ही तुमचं खरं वय कमी करू शकत नाही, पण बायोलॉजिकल वय कमी केलं जाऊ शकतं. हे कंट्रोल करून तुमचं संभावित आयुष्य वाढवलं जाऊ शकतं. याबाबत डॉक्टरांनी सांगितलं.
काय असतं बायोलॉजिकल वय?
एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून बायालोॉजिकल वय माहीत करून घेता येतं. या टेस्टमधून शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचं वय समजतं. हृदय, मेंदू, फुप्फुसं, टिश्यू इत्यादी कोणत्या वयानुसार काम करतात हे जाणून घेता येतं. हे कंट्रोल करून आजारांना दूर ठेवलं जाऊ शकतं. तुम्ही बाहेरून कितीही म्हातारे दिसले, तरी हृदय तरूणच रहाल.
उपवास करून कमी करू शकता वय
डॉक्टर म्हणाले की, उपवास करून वाढतं वय कमी केलं जाऊ शकतं. त्यामुळे उपवास नक्की करावे. एक दिवसाच्या उपवासापासून सुरूवात करू शकता. डॉ. रवि यांनी ३ दिवस उपवास करण्याआधी आणि नंतर बायोलॉजिकल टेस्ट केली. जाणून घेऊ उपवासाच्या आधी आणि नंतर त्यांच्या अवयवांचं वय काय होतं.
अवयवांचं आयुष्य वाढलं
डॉक्टरांनी लागोपाठ तीन दिवस उपवास केला आणि यादरम्यान केवळ पाणी आणि टूथपेस्टचा वापर केला. उपवासानंतर टेस्टचे रिपोर्ट फारच आश्चर्यकारक आले. रक्त सोडून सगळ्यात अवयवांचं वय कमी झालेलं दिसलं. फुप्फुसं तर ४ वर्षानं तरूण झालेत.
३ दिवस उपवास करण्याआधी बायोलॉजिकल वय
फुप्फुसांचं वय ३२.१ वर्ष, रक्ताचं वय ३५.७ वर्ष, लिव्हरचं वय ३१.१ वर्ष, हृदयाचं वय ३२.१ वर्ष, किडनीचं वय ३३ वर्ष, मेंदुचं वय ३४.४ वर्ष, त्यांचं मूळ वय २९ वर्ष.
३ दिवस उपवास केल्यानंतरचं बायोलॉजिकल वय
फुप्फुसांचं वय २७.९ वर्ष, रक्ताचं वय ३६.५ वर्ष, लिव्हरचं वय २९.६ वर्ष, हृदयाचं वय २९.५ वर्ष, किडनीचं वय ३०.८ वर्ष, मेंदुचं वय ३३.५ वर्ष, मूळ वय २९ वर्ष.