Long life Tips : अनेकांना वाटत असतं की, त्यांनी जास्त काळ जगावं. अशात आयुष्य वाढवण्यासाठी बरेच लोक अनेक गोष्टींची काळजी घेतात. चांगला आहार, एक्सरसाईज करतात. अशात एका एमडी डॉक्टरांनी आयुष्य वाढवण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या असल्याचं सांगितलं. मॅनहॅटनच्या प्रिसिजन मेडिसीन डॉक्टर फ्लोरेंस कॉमाइट यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या तीन गोष्टी सांगितल्या.
१) चांगली झोप
डॉक्टर फ्लोरेंस यांनी झोपेची गुणवत्ता आणि क्रेविंग व इन्सुलिन कंट्रोल यांच्यात एक संबंध असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या की, लोकांनी चांगली आणि पुरेशी झोप घेण्यावर लक्ष दिलं पाहिजे. कारण आजकाल लोक कमी झोपतात. चांगली झोप घेतली नाही तर डायबिटीस, हृदयरोग, हाय बीपी, एंग्झायटी, डिप्रेशन यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे प्रत्येकानं कमीत कमी तास ते नऊ तास चांगली झोप घ्यावी. गाढ झोपेमुळे मांसपेशी, हाडं आणि पेशींची रिपेअरींग होते आणि इम्यूनिटी वाढते. तसेच चांगल्या झोपेनं मेंदुतील टॉक्सिनही नष्ट होतात.
२) मसल्स बनवा
डायबिटीस सामान्यपणे ३०, ४० आणि ५० वयात दिसणं सुरू होतो. कारण सगळ्याच लोकांचे मसल्स या वयात कमी होणं सुरू होतात. स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चमध्ये आढळलं की, जे लोक वेट ट्रेनिंग करतात. त्यांच्या फॅट कमी असतं आणि त्यांची ब्लड शुगरही बरोबर राहते.
वेट ट्रेनिंगनं कार्डिओ इतक्या कॅलरी लगेच बर्न होतात. मात्र, यानं मसल्स वाढतात आणि मजबूत होतात. मसल्स मेंटेन ठेवण्यासाठी जास्त कॅलरींची गरज असते. त्यामुळे मसल्स गेम करण्यासाठी वेट ट्रेनिंग करा.
३) ब्लड शुगर तपासत रहा
प्रत्येकांनी वेळोवेळी ब्लड शुगरची टेस्ट करावी. असं केलं नाही तर पुढे ही समस्या महागात पडू शकते. यासाठी तुम्ही ग्लूकोज मॉनिटरचा वापर करू शकता किंवा लॅबमध्ये जाऊनही टेस्ट करू शकता. जर तुम्हाला काही लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांना दाखवा.