शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला झोपल्यावर घाम येतो का? मग या कारणांचा विचार करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 12:44 IST

रात्री भरपूर घाम येत असेल तर डॉक्टरांना भेटून तपासणी केली पाहिजे तसेच त्यामागचे नक्की कारण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.

मुंबई- सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला भरपूर घाम आल्याचं लक्षात येतं का? असं असेल तर रात्री घाम घेणारे तुम्ही फक्त एकटेच आहात असे नाही. झोपल्यावर घाम येण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये तुम्ही घेत असलेल्या जाडजूड पांघरुणांपासून मसालेदार खाण्यापर्यंत आणि इतर अनेक लहानमोठ्या कारणांचा त्यामध्ये समावेश होतो. अमेरिकन बोर्ड आॅफ फॅमिली मेडिसिन या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये यातील काही कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. पॅनिक अटॅक्स, निद्राविषयक तक्रारी, ताप, हात आणि पायांना येणारे बधिरपण, चिंता, ताण आणि श्वास घेण्यासाठी होणारा त्रास अशी कारणं त्यांनी नमूद केली आहेत. नैराश्य आणि मधुमेहावरती दिल्या जाणाऱ्या काही औषधांमुळेही असा त्रास होऊ शकतो असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. काहीवेळेस कर्करोग, पक्षाघात, थॉयरॉइड संबंधी आजार यामुळेही घाम येऊ शकतो असे मत मेयो क्लिनिकतर्फे मांडण्यात आले आहे. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची पातळी कमी झाल्यामुळे रात्री घाम येण्याची शक्यता वाढते. रात्री अशाप्रकारे भरपूर घाम येत असेल तर डॉक्टरांना भेटून तपासणी केली पाहिजे तसेच त्यामागचे नक्की कारण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सInternationalआंतरराष्ट्रीय