शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

तुम्हाला आनंदी राहण्याची सायकॉलॉजी माहीत आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 12:47 IST

अनेकदा काही लोकांना आपण पाहतो की, सगळंकाही असूनही ते खूश नसतात. खूश राहणं ही एक सायकॉलॉजिकल क्रिया आहे.

(Image : www.thriveglobal.com)

अनेकदा काही लोकांना आपण पाहतो की, सगळंकाही असूनही ते खूष नसतात. खूश राहणं ही एक सायकॉलॉजिकल क्रिया आहे. त्यामुळे याबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सायकॉलॉजिला जाणून घेऊ शकत नसाल तर तुम्ही कधीही खूष राहू शकणार नाहीत. 

कधी कधी असेही बघायला मिळते की, लोक स्वत:बाबत फार नकारात्मक असतात. नकारात्मकता येताच तुमच्या जीवनात दु:खाचा प्रवेश होतो. अशात आम्ही तुम्हाला सायकॉलॉजिकल बाबी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला खूष राहण्यापासून दूर ठेवतात. चला जाणून घेऊ खूष राहण्याची सायकॉलॉजी.

काळजी करण्याची सवय

काळजी करण्याची सवय व्यक्तीच्या दु:खाचं मोठं कारण असू असतं. अनेकदा आपण पाहतो की, आपण दुसऱ्यांचा फार जास्त विचार करतो आणि दु:खी होतो. कधी कधी कुणी तुमची काळजी घेत नाही हे बघूनही दु:ख होतं. यो दोन्ही सवयींमधून वेळीच बाहेर यायला हवं कारण या सवयींमुळे तुम्हाला दु:ख होतं. त्यामुळे फार काळजी करणे सोडा. 

तुलनात्मक दृष्टीकोन

अलिकडे लोक फार जास्त तुलनात्मक विचार करुन जगत आहेत. सोशल मीडियामुळे हा तुलनात्मक प्रभाव अधिकच वाढवला आहे. अनेकदा लोक सोशल मीडियातील इतर लोकांच्या वागण्याची स्वत:शी तुलना करु लागतात आणि याने निराश होतात. या समस्येतून जितकं जमेल तितकं लगेच बाहेर या. 

सल्ला दिल्यावर कुणी दुर्लक्ष करणे

अनेकांची ही सवय असते की, त्यांना कोणत्याही विषयात सल्ला द्यायचा असतो. अनेकदा हे पाहिलं गेलंय की, जर काहींनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा तो ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं गेलं तर त्यांना दु:ख होतं. पण तुम्ही दिलेला सल्ला ऐकलाच गेला पाहिजे किंवा लोकांनी तसंच वागलं पाहिजे हा विचार तुम्ही करताच का? सल्ला देणं तुमचं काम आहे, तो ऐकायचा कि नाही हे समोरच्या व्यक्तीचं काम. त्यामुळे या विचारातून बाहेर या.

स्वत:वर प्रेम करा

स्वत:वर प्रेम करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसऱ्या कुणाला उत्तर देण्यापेक्षा आधी स्वत:ला उत्तर देणं शिका. जर जीवनात तुम्ही आनंदी राहण्याचा मार्ग शोधत असाल तर स्वत:वर प्रेम करायला शिका. याने तुम्ही वेगवेगळ्या तुलनांमधून आणि दु:खातून बाहेर याल.

बदलासाठी तयार रहा

बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि जेव्हा तुम्ही हा बदल समजू शकत नाहीत तेव्हा तुम्ही दु:खी राहता. जीवनात जे काही बदल होताहेत ते स्विकार करा आणि खूष राहण्याचा प्रयत्न करा. बदलांमुळे तुमचा तणावही कमी होतो.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स