शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या शरीराबाबतच्या अशा गोष्टी ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, बसेल आश्चर्याचा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:05 IST

Interesting facts about human body : आज आम्ही तुम्हाला मानवी शरीराबाबत अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही याआधी कधी विचारही केला नसेल आणि ही माहिती नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. 

Interesting facts about human body : आपल्या स्वत:च्या शरीराची सगळेच काळजी घेतात. सगळ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या अवयवांबाबत माहीत असतं. पण अशाही काही गोष्टी असतात ज्यांबाबत अनेकांना काहीच माहीत नसतं. आज आम्ही तुम्हाला मानवी शरीराबाबत अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही याआधी कधी विचारही केला नसेल आणि ही माहिती नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. 

दिवसभर आपल्या तोंडात किती लाळ तयार होते?

दिवसभर लोक इथे-तिथे थुंकत असतात. पण कधी तुम्ही कधी विचार केलाय का की, जर दिवसभराची थुंकी मोजली गेली तर किती होईल. तज्ज्ञांनुसार, दिवसभर आपल्या तोंडात साधारण १ लिटर थूंकी तयार होते.

मेंदू जास्त वेगाने कधी क्रिया करतो?

शारीरिक थकवा आणि मेंदूचा थकवा दोन्हींसाठी आपण झोप घेऊन मेंदूला आराम देणं पसंत करतो. शरीरासंबंधी रोमांचक एक तथ्य असंही आहे की, मेंदू आपण जागे असताना नाही तर झोपेत जास्त अॅक्टिव असतो. तुम्ही भलेही झोपेत असाल पण मेंदू तेव्हाही काम करत असतो.

मसल्स...

मसल्स हा शब्द लॅटिन भाषेतील लिटिल माउसपासून तयार झाला आहे. प्राचीन रोमन असं मानत होते की, बायसेपचे मसल्स हे उंदरासारखे दिसतात. रोमनंतर हा शब्द भारतातील काही क्षेत्रांमध्ये पोहोचला आणि मस्ती करण्याचं एक माध्यम बनला. 

किती लांब असतात आपल्या रक्तवाहिन्या

शरीराशी संबंधित रोचक तथ्य असंही आहे की, मनुष्याचं हे छोटं शरीर फारच अद्भूत आहे. पृथ्वीसमोर आपण एका मुंगीप्रमाणे सुद्धा नसू. पण आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या छोट्या नाहीत. रक्तवाहिन्यांबाबत असं बोललं जातं की, एका तरूण व्यक्तीच्या ब्लड वेसल्स १०० हजार मैलपर्यंत लांब असू शकतात. 

अब्जावधी सुगंध लक्षात ठेवतं नाक

मेंदूचं थोडं काम नाकही वाढवतं. नाकाबाबत असं सांगितलं जातं की, नाक अब्जो सुगंध आणि दुर्गंधीना ओळखू शकतं. हे जर तुम्हाला आधी माहीत नव्हतं तर आता तुमच्या नाकाची शक्ती तपासून बघा.

पृथ्वीवर केवळ मनुष्यच ब्लश करतो

एखाद्याला पसंत केल्यावर ब्लश करणं किंवा एखाद्याचं नाव ऐकताच ब्लश करणं तुम्ही अनुभवलं असेलच. ब्लश करणं किंवा लाजणं ही सामान्य बाब आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, पृथ्वीवर असलेल्या प्राण्यांपैकी केवळ मनुष्य असा एक प्राणी आहे जो ब्लश करतो. त्यामुळे ब्लश करण्यात आता कंजूशी करू नका, कारण ही गोष्ट तुम्हाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं ठरवते.

नवजात बाळाच्या शरीरात ३०० हाडे

तुम्हाला माहीत आहे का की, एका व्यक्तीमध्ये किती हाडे असतात? नसेल तर जाणून घेऊ. एका व्यक्तीमध्ये २०६ हाडे असतात. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, एका नवजात बाळाच्या शरीरात ९४ हाडे जास्त असतात. म्हणजे एका बाळाच्या शरीरात ३०० हाडे असतात. ही जास्तीची हाडे नंतर काळानुसार एकत्र जुळून २०६ होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य