शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Cholesterol वाढल्याचं समजताच 'या' गोष्टी करा, अनेक समस्यांपासून होईल बचाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 11:06 IST

High Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल वाढला तर अनेक समस्या होतात. याने हृदयासंबंधी अनेक समस्या वाढतात. अशात हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत.

हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आजकाल बऱ्याच लोकांना होत आहे. ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि तुम्हाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. शरीरात इतरही अनेक समस्या होऊ लागतात. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं ही एक गंभीर आणि जीवघेणी समस्या आहे. अशात जर तुम्ही टेस्ट केली असेल आणि बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढलेली असेल तर बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

High Cholesterol : शरीरात कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरा म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. या दोन्हींचं संतुलन ठेवणं फार गरजेचं असतं. गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी गरजेचा असतो आणि हा हृदयासाठी चांगलाही असतो. पण बॅड कोलेस्ट्रॉल वाढला तर अनेक समस्या होतात. याने हृदयासंबंधी अनेक समस्या वाढतात. अशात हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत.

कोमट पाणी प्या

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर थंड पाणी पिण्याऐवजी हलकं कोमट पाणी प्यावे. याने बॅड कोलेस्ट्रॉल डिटॉक्स आणि नसा मोकळ्या करण्यास मदत मिळेल. कोमट पाणी प्यायल्याने बॉडी डिटॉक्स होते ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.

नियमित एक्सरसाइज करा

एक्सरसाइज केल्याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि तुम्ही वेगाने कॅलरी जाळू शकता. ज्यामुळे तुम्हाला वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी केल्यानेही हाय कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते.

धुम्रपान बंद करा

धुम्रपान करणाऱ्या लोकांना केवळ फुप्फुसाची समस्या होते असं नाही तर त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यातील एक समस्या म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलही आहे. ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल त्यांनी अजिबात धुम्रपान करू नये. याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

ऑलिव्ह ऑइलचा वापर

एक्सपर्ट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करण्यास सांगतात. तर रिफाइंड ऑइल टाळण्याचा सल्ला देतात. ऑलिव्ह ऑइलमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट शरीरासाठी फायदेशीर असतात. याने हृदयरोगांचा धोका कमी होतो.

प्रोसेस्ड फूड खाणं बंद करा

आजकाल जास्तीत जास्त लोक जंक आणि प्रोसेस्ड फूड जास्त खाणं पसंत करतात. हे फूड्स कोलेस्ट्रॉल वाढण्याचं एक मोठं कारण आहे. त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉलपासून बचावासाठी हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करा. जास्त मसालेदार, तळलेले पदार्थ खाऊ नका. पौष्टिक आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

मद्यसेवन बंद करा

खूप जास्त मद्यसेवन करणं हे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. अशात तुम्ही मद्यसेवन केलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल आणखी जास्त वाढेल आणि तुम्हाला हृदयरोगाचा धोकाही वाढेल. त्यामुळे मद्यसेवन बंद करा.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स