शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

तुम्ही प्लॅस्टिकचा तांदूळ तर खात नाही ना? घरच्या घरी या 7 टेस्ट करून पाहा!

By admin | Published: June 20, 2017 6:20 PM

आपण घेतला तो तांदूळ खरा आहे की प्लॅस्टीकचा हे ओळखणं अगदीच सोपं आहे

- सारिका पूरकर-गुजराथीगेल्या आठवड्यात हैदराबादमधील एका इसमानं प्लॅस्टिक तांदुळ वापरुन बिर्याणी तयार केली जात असून ती ग्राहकांना सर्व्ह केली जात असल्याची तक्रार केली होती. तसेच त्यानंतर एका व्यक्तीनं स्थानिक किराणा दुकानातही प्लॅस्टिक तांदळाची विक्री होत असल्याची तक्रार केली होती. एवढंच नाही तर प्लॅस्टिक तांदळापासून केलेल्या भाताचे बॉल्स कसे चेंडूप्रमाणे उसळी मारतात याचा व्हिडिओही जारी करण्यात आला होता. यास्वरूपाच्या तक्रारीनंतर हैदराबाद, तेलंगाणा, उत्तराखंड या भागात प्लॅस्टिक तांदळाची चांगलीच धास्ती नागरिकांनी घेतली आहे. कारण हा प्लॅस्टिक तांदुळ चीनी बनावटीचा तर आहेच शिवाय तो आरोग्याला अत्यंत घातक आहे.

 

प्लॅस्टिक तांदळाचं सेवन अधिक प्रमाणात केल्यास कॅन्सरचा धोकाही निर्माण होऊ शकतो. म्हणूनच या प्लॅस्टिक तांदळाचं नाव जरी घेतलं तरी आता येथील नागरिक भात खाण्यासच चाचरत आहेत. प्लॅस्टिक तांदळाने भारतीय बाजारपेठेत केव्हाच शिरकाव केला आहे. गुजरातमार्गे हा तांदुळ महाराष्ट्रातही येतो अशीही माहिती समोर आली होती. चीनप्रमाणेच सिंगापूर, इंडोनेशिया, व्हिएतनाम हे देखील प्लॅस्टिक तांदूळ उत्पादक देश म्हणून ओळखले जातात. प्लॅस्टिक तांदळाचा ओघ या देशांमधून भारतात येतो. गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्लॅस्टिक तांदळानं चांगलाच धूमाकुळ घातलाय. कारण दिसायला आपल्या नेहमीच्या तांदळासारखाच असल्यानं तो चटकन ओळखता येत नाही. शिवाय या तांदळाची किंमतही तुलनेत कमी असते. त्यामुळे तांदुळ खरेदी करताना सर्वसामान्य ग्राहक आपसूकच प्लॅस्टिक तांदुळ खरेदी करतो. या प्लॅस्टिक तांदळाची विक्री छोट्या दुकानांमध्ये जास्त प्रमाणात होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या तांदळामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. चीनी पॉलिमरचा वापर हा तांदूळ तयार करताना केला जातो. तर असा हा प्लॅस्टिक तांदूळ तुमच्या वाट्याला तर आला नाही ना? पण ते ओळखायचं कसं? हे ओळखणं खूप सोपं आहे. त्यासाठी या सिम्पल टेस्ट करून पाहा.प्लॅस्टिक तांदूळ कसा ओळखावा? १) पाण्याचा ग्लास एकदम सोपी युक्ती आहे ही. एका ग्लासमध्ये, बाऊलमध्ये पाणी भरुन घ्या. त्यात प्लॅस्टिक तांदूळ घाला. तांदूळ जर तळाशी जाऊन बसले तर तांदूळ चांगल्या प्रतीचे आहेत असं समजावं. पण जर का तांदूळ पाण्यावर तरंगले तर ते प्लॅस्टिक तांदूळच आहेत यात तीळमात्रही शंका नाही. २) तांदळाची चमक भारतीय बनावटीच्या किंवा उच्च प्रतीच्या तांदळाला कमी चमक असते. परंतु प्लॅस्टिक तांदूळ मात्र दिसायला एकदम चकचकीत आणि गुळगुळीत दिसतात.

 

 

३) बर्न टेस्ट प्लॅस्टिक जाळले की त्याच्यातून एकप्रकारचा उग्र वास येतो. तीच टेस्ट तांदळावरही करून पाहता येते.. थोडे तांदूळ घेऊन ते काडीनं पेटवा. ते जळू द्या. जळताना जर प्लॅस्टिक जळल्यासारखा वास आला तर ते प्लॅस्टिक तांदूळ समजावे. चांगले तांदूळ जाळले तर ते काळे होतात आणि त्यातून वास येत नाही.

             

४) बुरशी टेस्ट तांदूळ नेहमीप्रमाणे शिजवून भात तयार करुन घ्यावा. भाताचं प्रमाण कमी घ्यावं. हा भात एका भांड्यात घालून घरात एका ठिकाणी, किचन ओट्यावर, टेबलवर तसाच ठेवून द्यावा. तो फ्रीजमध्ये ठेवायचा नाही. एरवी आपण भात असा दोन-तीन दिवस ठेवला तर त्यावर चटकन बुरशी चढते. मात्र प्लॅस्टिक तांदळाच्या भातावर ती चढत नाही. म्हणूनच या भातावर बुरशी चढली तर तो चांगल्या प्रतीचा तांदूळ समजावा अन्यथा बुरशी नाही चढली तर प्लॅस्टिक तांदूळ समजावा.५) गरम तेल एका भांड्यात गरम तेल घ्या. यात तांदूळ घाला. जर तो प्लॅस्टिक तांदूळ असेल तर भांड्याच्या तळाशी वितळलेल्या प्लॅस्टिकचा थर जमा होईल. आणि जर चांगला तांदूळ असेल तर तो वर तरंगेल. ६) पावडर टेस्ट तांदळाचे काही दाणे घ्या. ते चांगले कुटून घ्या. कुटताना बारीक लक्ष द्या. जर तांदळाची पीठी शुभ्र पांढऱ्या रंगाची झाली तर ते चांगल्या प्रतीचे तांदूळ आहेत असं समजावं. परंतु, तांदळाच्या पीठीला पिवळसर झाक आली किंवा कुटल्यानंतर भांड्याला, बत्त्याला पिवळसर डाग पडले तर ते नक्कीच प्लॅस्टिक तांदूळ आहेत असं समजावं. ७) चिकटपणा प्लॅस्टिक तांदूळ शिजवला की त्याचा एक चिकट थर भातावर जमा होतो. हा थर इतका जास्त असतो की चमच्यानं तो आपण वेगळा करु शकतो. असा थर चांगल्या प्रतीच्या तांदळावर जमा होत नाही.