शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या पोटी झोपण्याची सवय आहे अतिधोकादाय, बळावतील 'हे' गंभीर आजार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 12:44 IST

रिकाम्या पोटी झोपण्याची सवय तुम्हाला लवकरात लवकर बदलावी (sleeping empty stomach) लागेल. कारण यामुळे तुमच्या आरोग्याला धोका उद्धभवू शकतो.

आपल्याला जास्त काम असल्यामुळे किंवा जेवण बनवून खाण्याचा कंटाळा आल्यामुळे आपण न जेवता किंवा न काही खाता फक्त पाणी पिऊन झोपतो. परंतु अशी रिकाम्या पोटी झोपण्याची सवय तुम्हाला लवकरात लवकर बदलावी (sleeping empty stomach) लागेल. कारण यामुळे तुमच्या आरोग्याला धोका उद्धभवू शकतो. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीनूसार, लठ्ठपणामुळे ग्रस्त बर्‍याच लोकांना असे वाटते की, रात्री रिकाम्या पोटी झोपल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हालाही असे वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहेत. जरी तुम्हाला वजन कमी करायचे असले तरी, रात्री हलके अन्न खालेच पाहिजे, रिकाम्या पोटी कधीही झोपू नये. (sleeping empty stomach)

रिकाम्या पोटी झोपेण्याचे तोटे काय? 

स्नायू कमकुवत होण्याचा धोकाजे लोक रात्री रिकाम्या पोटी झोपतात त्यांचे स्नायू कमकुवत होण्याचा धोका असतो, रिकाम्या पोटी झोपल्याने प्रथिने आणि एमिनो ऍसिडच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ लागतो. स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी, अन्न योग्य वेळी आणि योग्य मार्गाने खाणे महत्वाचे आहे.

निद्रानाशची समस्याजर तुम्ही दररोज रात्री रिकाम्या पोटी झोपत असाल तर, आपल्याला निद्रानाशाचा सामना करावा लागू शकतो. कारण जेव्हा आपण रात्री रिकाम्या पोटी झोपतो, तेव्हा तुमचा मेंदू आपल्याला जेवण जेवायला हवे असे सिग्नल देत असतो. ज्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही. जेव्हा तुम्ही काही न खाता नेहमी झोपण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला झोपेचा त्रास (Health) होऊ लागतो. जी हळूहळू तुमची सवय बनते आणि हीच निद्रानाशाच्या समस्येची सुरुवात असते.
उर्जा पातळी कमी होतेजर तुम्ही रात्री रिकाम्या पोटी झोपत असाल, तर तुमची उर्जा पातळी कमी होऊ शकते. यामुळे तुम्हाला दिवसभर कमकुवत आणि थकल्यासारखे वाटू शकते. जी नंतर कालांतराने आपल्या शरीरासाठी एक मोठी समस्या बनू शकते.
चयापचय प्रक्रियेत अडथळाआहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, जर तुम्ही अनेक दिवसांपासून रात्रीचे जेवण वगळत असाल किंवा तुमची खाण्याची पद्धत योग्य नसल्यास तुम्हाच्या चयापचयनावर (Health) वाईट परिणाम होऊ शकतो.यामुळे तुमची इन्सुलिन पातळी असंतुलित होऊ शकते. कोलेस्टेरॉल आणि थायरॉईडची पातळी देखील चिंताजनक होऊ शकते. तुम्ही योग्य वेळी, योग्य अन्न न खाल्ल्याने तुमच्या संप्रेरकांवर परिणाम होईल, ज्यामुळे तुम्हाला बर्‍याच रोगांचे आजार उद्भवू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स