शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

केवळ सोशल मीडियावर फोटो टाकायला मॅरेथॉनमध्ये धावू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2023 09:50 IST

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात विविध संस्था मॅरेथॉनचे आयोजन करत आहेत.

डॉ. अजय चौरासिया, हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात विविध संस्था मॅरेथॉनचे आयोजन करत आहेत. विशेष म्हणजे, त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.  निरोगी आरोग्यासाठी चालणे, धावणे फायदेशीर आहे. मात्र, अनेक उत्साही तरुण-तरुणी  केवळ मॅरेथॉन जाहीर झाली आहे, इतर सहभागी होत आहेत म्हणून सहभागी होतात. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. फिजिओथेरपिस्ट, जनरल फिजिशियन यांचा सल्ला घ्या. स्वत:ची वैद्यकीय चाचणी करून घ्या. स्वत:ला कुठलाही आजार नाही ना, याची खात्री करून घ्या. हृदयाची तपासणी करून घ्या.  

मॅरेथॉनमध्ये धावायचे असेल तर त्यासाठी नियमितपणे शास्त्रशुद्ध सराव आणि प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. सुरुवात सर्वात छोट्या ‘र’ने करा. मग टप्प्याटप्याने पुढे जा. यासाठी नियमितपणे रोज सकाळी धावण्याचा सराव केला पाहिजे. केवळ मॅरेथॉन आली आहे, म्हणून प्रॅक्टिस नको. यामध्ये वर्षभर सातत्य असले पाहिजे. जर कोणत्याही व्यक्तीला काही वैद्यकीय समस्या असतील तर त्याला नजरेआड करून धावण्याचा अट्टहास करू नये. आपण धावण्यासाठी योग्य आहोत का? हे तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रमाणित करून घ्या. कुणाला तरी दाखवायचे आहे, सोशल मीडियावर फोटो टाकायचे आहे म्हणून मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊ नका. आरोग्य जोपासण्यासाठी आपण धावत आहोत, हे कायम लक्षात ठेवा.   

गेल्या काही वर्षांत मॅरेथॉनसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत आहे.  खूप जणांची धावायची इच्छा असते. अनेकांची वैद्यकीय कारणांनी ती पूर्ण होत नाही. मात्र, आता वॉकेथॉन नावाचा प्रकार सुरू झाला आहे. अनेक सामाजिक संस्था समाजात जनजागृती घडविण्यासाठी याचे आयोजन करत असतात. ज्यांना मॅरेथॉनमध्ये भाग घेणे शक्य नाही त्यांनी तिकडे जावे.

या आहेत काही टिप्स

- धावण्याच्या सरावास सुरुवात करताना प्रथम चाला, वेग वाढवा, मग धावा.  सगळ्या गोष्टी हळूहळू करा.

- शरीराच्या विरोधात जाऊन कोणतीही गोष्ट करू नका, ज्या क्षणी काही दुखत असेल तर थांबा.

- मॅरेथॉनपूर्वी किमान सहा महिन्यांपासून सराव सुरू करावा, त्यानंतर कायम सातत्य ठेवावे.

- शारीरिक क्षमता तज्ज्ञांकडून तपासून घ्यावी. 

- ध्येय निश्चित करून सराव करावा.

- संतुलित आहारासोबत स्नायू बळकटीकरणासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्याने  प्रोटीन, प्रथिने घ्या. 

- शरीराच्या ठेवणीकडे लक्ष द्या, प्रशिक्षकाकडून योग्य फिटनेसचे धडे घ्या. 

- जाहिरातीतील शूज चांगले असतीलच असे नाही, चौकशी करून चांगले शूज घ्या. 

- पुरेशी झोप महत्त्वाची आहे.

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स