शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

पपईसोबत चुकूनही खाऊ नका ही फळं, गंभीर समस्यांचा होऊ शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 11:30 IST

Do Not Eat These Foods With Papaya: पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स 60 असतो आणि यात डायटरी फायबर आढळतं, त्यामुळेच फिटनेस एक्सपर्ट रोज पपई खाण्याचा सल्ला देतात.

Do Not Eat These Foods With Papaya:  : सामान्यपणे पपई आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असते. पपई खाल्ल्याने वजन कमी होतं, पचनक्रिया सुधारते आणि डायबिटीस कंट्रोल करण्यासही मदत मिळते. पपईमध्ये फॅट, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी, ए, ई, बी, खनिज, प्रोटीन आणि डायटरी फायबरसारखे अनेक पोषक तत्व आढळून येतात. केवळ इतकंच नाही तर यात अल्फा, बीटा, कॅरोटीन आणि ल्यूटिन नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंटही असतं.

पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स 60 असतो आणि यात डायटरी फायबर आढळतं, त्यामुळेच फिटनेस एक्सपर्ट रोज पपई खाण्याचा सल्ला देतात. पपईमध्ये आढळणारं पॅपीन एंजाइम अॅलर्जीसोबत लढतं आणि जखम भरण्यास मदत करतं. बरेच फायदे असूनही पपईचं सेवन करण्याचे काही नुकसानही आहेत.

फिटनेस गुरू होलिस्टिक एक्सपर्ट मिकी मेहता यांनी सांगितलं की, कोणते पदार्थ पपईसोबत खाल्ल्याने विषासारखा प्रभाव होऊ शकतो. हे पदार्थ पपईसोबत खाल्ले तर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊ कोणते आहेत ते पदार्थ...

लिंबासोबत पपई

पपई आणि लिंबाचं एकत्र सेवन चांगलं मानलं जातं नाही. जर तुम्ही सलादमध्ये पपई खात असाल तर त्यात लिंबाचा रस टाकू नका. याने ते विषारी होतं. लिंबू आणि पपई एकत्र खाल्ल्याने हीमोग्लोबिन लेव्हल असंतुलित होते आणि व्यक्ती एनीमियाचा शिकार होऊ शकते. त्यामुळे चुकूनही पपईसोबत लिंबूचं सेवन करू नका.

दह्यासोबत पपई

पपई उष्ण असते तर दही हे थंड असतं. त्यामुळे पपईनंतर लगेच दही खाणं टाळलं पाहिजे. जर तुम्ही पपई खाल्ली असेल तर त्यानंतर दोन ते तीन तासांनंतरच दही खा. थंड आणि उष्ण हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. याने तुम्ही आजारी पडू शकता.

संत्रीसोबत पपई

लिंबूप्रमाणेच संत्रीही आंबट असतात. फ्रूट सलादमध्ये पपई आणि संत्री एकत्र करून कधीच खाऊ नये. याने पोटात विषारी पदार्थ तयार होतात. ज्यामुळे तब्येत बिघडू शकते. 

टोमॅटोसोबत पपई

पपई आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन चांगलं मानलं जात नाही. या दोन्हींचं एकत्र सेवन करणं विषार ठरू शकतं. त्यामुळे पपई आणि टोमॅटो कधीच एकत्र खाऊ नये.

कीवीसोबत पपई

कीवी एक आंबट फळ आहे. पपईसोबत कीवी खाल्ल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे हे दोन फळ एकत्र कधीच खाऊ नये.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य