शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

झोपण्याआधी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, वजन तर वाढेलच अन् पोटही बाहेर येईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 11:02 IST

डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंह यांनी झी न्यूजला सांगितले की, अनहेल्दी डीनरमुळेही वजन वाढतं. तुम्ही जेव्हा रात्री उशीरा जेवण करता आणि जेवण केल्यावर लगेच जाऊन झोपत असाल तर यापेक्षा मोठी चूक नाही.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाने हैराण झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून लोक कोरोनामुळे घरातच कैद झाले आहेत. छोट्या मोठ्या कामाशिवाय त्यांच्याकडे आवडीचे पदार्थ खाणं हेच काम शिल्लक राहिलं आहे. घरातच असल्याने अनेक लोक अनहेल्दी डाएट घेत आहेत. ज्यामुळे त्यांचं वजन वाढत आहे. काही लोक वजन कमी करण्यासाठी हलका आहार घेण्याचा प्रयत्न करतात. हे लोक डीनरला फार महत्व देत नाहीत. पण त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे.

डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंह यांनी झी न्यूजला सांगितले की, अनहेल्दी डीनरमुळेही वजन वाढतं. तुम्ही जेव्हा रात्री उशीरा जेवण करता आणि जेवण केल्यावर लगेच जाऊन झोपत असाल तर यापेक्षा मोठी चूक नाही. याने वजन जास्त वाढतं. डॉ. रंजना सिंह सांगतात की, झोपण्याच्या साधारण २ तास आधी रात्रीचं जेवण केलं पाहिजे. तसेच त्यांनी रात्री कोणते पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं तेही सांगितलं आहे. चला जाणून घेऊ वजन वाढवायचं नसेल तर रात्री कोणते पदार्थ खाऊ नये. (हे पण वाचा : चिंता वाढली! आणखी घातक होत आहे कोरोना व्हायरस, रूग्णांमध्ये दिसू लागलेत हे नवीन गंभीर लक्षणे!)

१) नूडल्स

डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंह यांनी सांगितले की, जर तुम्ही रात्री नूडल्स खात असाल तर वेळीच ही सवय बंद करा. कारण यात असलेल्या कार्ब आणि फॅट्समुळे तुमचं आरोग्य धोक्यात येतं. यात फायबर अजिबात नसतं आणि या सर्व कारणांमुळे तुमचं वेगाने वजन वाढतं. जास्तीत जास्त लोकांचं याच कारणाने पोट बाहेर येतं. 

२) चॉकलेट

डाएट एक्सपर्ट डॉ. सिंह यांच्यानुसार, चॉकलेटमध्ये कॅफीनसोबतच शुगरचं प्रमाण जास्त असतं. या गोष्टी तुमचं वजन वाढवण्यासाठी जास्त कारणीभूत ठरतात. त्यामुळे डीनर झाल्यावर म्हणजेच रात्रीचं जेवण झाल्यावर चॉकलेट खाणं टाळावं. इतर वेळी तुम्ही चॉकलेट खाल तर त्याचे फायदेही होतात.

३) फ्राइड फूड

फ्राइड फूड म्हणजे तळलेले पदार्थ वजन वेगाने वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. तुम्ही पाहिलं असेल की, अनेक डॉक्टरही तळलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. फ्राइड फूडमध्ये कार्ब आणि फॅटी अ‍ॅसिड असतं. जे पोटातील अ‍ॅसिडीट आणि वजन वाढवण्याचं काम करतात. त्यामुळे प्रयत्न करा की, रात्री हलका आहार घ्या. जे सहजपणे पचेल.

४) सोडा

काही लोक रात्रीचं जेवण पचवण्यासाठी सोडा पिणं पसंत करतात. त्याची काही लोकांना सवयच असते. पण तुम्हाला माहीत नसेल की, यात हाय शूगर कंटेंट असतो. ज्याने बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे बरं होईल की, तुम्ही झोपण्याआधी सोडा सेवन करू नये. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स