शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ही दिवाळी दम्याच्या रुग्णांसाठी अतिगंभीर, तज्ज्ञांनी दिला हा धोक्याचा इशारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 17:53 IST

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवा अत्यंत विषारी झाली आहे. त्यामुळे आकाशात धुके पसरले असून डोळ्यातून पाणी येणे, घसादुखी, डोकेदुखी अशा समस्यांमधून नागरिकांना जावे लागत आहे. परंतु ही स्थिती त्याहूनही घातक आहे. अशा लोकांसाठी जे दमा किंवा श्वसनाच्या कोणत्याही आजाराचे रुग्ण आहेत.

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवा अत्यंत विषारी झाली आहे. त्यामुळे आकाशात धुके पसरले असून डोळ्यातून पाणी येणे, घसादुखी, डोकेदुखी अशा समस्यांमधून नागरिकांना जावे लागत आहे. परंतु ही स्थिती त्याहूनही घातक आहे. अशा लोकांसाठी जे दमा किंवा श्वसनाच्या कोणत्याही आजाराचे रुग्ण आहेत.

तज्ज्ञांच्या मते, वायू प्रदूषण सर्वांसाठीच हानिकारक आहे. त्यामुळे निरोगी लोकही आजाराच्या विळख्यात पडतात कारण प्रदूषणामुळे विषारी हवा श्वासोच्छवासाद्वारे आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचते. परंतु दमा, क्षयरोग, न्यूमोनिया, आयएलडी किंवा इतर कोणत्याही श्वसनाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी प्रदूषित विषारी हवा धोकादायक ठरू शकते आणि त्यांची स्थिती गंभीर होऊ शकते.

तज्ज्ञांचे मत काय जाणून घ्याश्‍वसन तज्ज्ञ डॉ. निष्ठा सिंह यांनी टीव्ही ९ हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, भारतात अस्थमाचा प्रसार झपाट्याने होत आहे. मुलांमध्येही ही समस्या झपाट्याने वाढत आहे. सध्या सुमारे १.५ ते २० दशलक्ष लोक या समस्येने त्रस्त आहेत. झपाट्याने वाढत जाणारे प्रदूषण हे त्याचे एक मोठे कारण आहे. दम्याच्या वेळी, एखाद्या व्यक्तीच्या वायुमार्गांना सूज येते आणि ज्यामुळे समस्या वाढण्यास सुरूवात होते. यामुळे श्वास घेण्यास खूप त्रास होतो.

ही लक्षणे दिसल्यास सावध व्हाश्वासोच्छवासाचा त्रास, घरघर किंवा शिट्टीचा आवाज, छातीत घट्टपणा जाणवणे, अस्वस्थ वाटणे, खोकला, डोके जड होणे, थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. जर तुमच्यासोबतही अशी समस्या होत असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याशिवाय दम्याच्या रुग्णांनी नेहमी सोबत इनहेलर ठेवावे जेणेकरुन अटॅक आल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल.

समस्या टाळण्यासाठी ही खबरदारी घ्याप्रदूषणाच्या काळात घराबाहेर पडणे टाळा. गरज भासल्यास मास्क लावून बाहेर जा. हिवाळा सुरू झाला आहे, त्यामुळे शरीराला उबदार ठेवणारे कपडे घाला. तंबाखू, सिगारेट इत्यादी टाळा. स्वयंपाकघरातील धुरापासून स्वतःचे संरक्षण करा. जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर घराबाहेर पडताना इनहेलर सोबत ठेवा. अधिक समस्या असल्यास तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स