शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

Diwali 2017 : ​दिवाळीत मौज-मस्तीबरोबरच आरोग्यही सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 8:15 AM

दिवाळीदरम्यान जास्त प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ सेवन केल्याने मात्र वजन वाढण्याबरोबरच इतर आरोग्याच्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत मौज-मस्ती बरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी.

-रवींद्र मोरे सण-उत्सव आले म्हणजे विविध खाद्यपदार्थांची मेजवानी आलीच आणि भारतीय सण तर स्वादिष्ट खाद्यान्नांशिवाय अपूर्णच आहेत. त्यातच दिवाळीला तर आपण सर्वचजण मौज-मस्तीबरोबरच मिठाई आणि विविध चविष्ठ पदार्थांना प्राधान्य देतो.  दिवाळीदरम्यान जास्त प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ सेवन केल्याने मात्र वजन वाढण्याबरोबरच इतर आरोग्याच्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत मौज-मस्ती बरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी.  * दिवसभराचे नियोजन करावे सणासुदीच्या दिवसात बऱ्याचदा आपले मित्र-नातेवाईकांकडे येणे-जाणे सुरु असते, त्यामुळे बऱ्याचप्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन होते. यापासून बचावासाठी आपण संपूर्ण दिवसाचे नियोजन करायला हवे. जर रात्री दिवाळीच्या पार्टीत जायायचे असेल तर आपला ब्रेकफास्ट आणि दुपारचे जेवण अगोदरच हलके असावे आणि पार्टीला जाण्याअगोदर काही हेल्दी स्रॅक्स सेवन करून जावे, जेणेकरुन पोट भरलेले राहील. पार्टीच्या ठिकाणी हेवी आणि रिच पदार्थ सेवन करणे टाळावे.   * घरात बनलेल्या मिठाई  बाजारात बनविलेल्या मिठाईमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. याशिवाय यात अतिरिक्त कृत्रिम रंग आणि मेटानिल येलो, लेड नाइट्रेट, म्यूरिएरिक अ‍ॅसिडसारखे हानिकारक रसायनेदेखील असतात. यामुळे मोठ्याप्रमाणात शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. यासाठी घरातच बनलेल्या मिठाईंचे सेवन करणे आरोग्यदायी ठरेल.  * आरोग्यदायी स्रॅकिंग  बऱ्याचदा आपण दिवाळीदरम्यान गोड पदार्थांबरोबरच मीठ आणि वसायुक्त पदार्थही मोठ्याप्रमाणात सेवन करतो. याचाही परिणाम आरोग्यावर होतो. यासाठी या पदार्थांना आरोग्यदायी ट्विस्ट देण्यासाठी बनविण्याच्या पद्धतीत बदल करणे हा देखील एक चांगला उपाय ठरु शकतो. जसे की, तळण्याऐवजी बेक करावे. बेक केलेल्या चकल्या आणि पुड्या, कमी वसायुक्त खाखरा आणि भाजलेला चिवडा आदी पदार्थ चविष्ट तर असतातच शिवाय स्वास्थवर्धकही असतात.   * भरपूर पाणी या दिवसात भरपूर धावपळ असल्याने आपण बऱ्याचदा पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करत नाही. पाण्याच्या कमतरतेने थकवा आणि कमजोरी येते. तसेच हा थकवा घालविण्यासाठी बऱ्याचदा गोड सरबत आणि एरियेटिड ड्रिंक्स सेवन करतो. त्यामुळे वेगाने वजन वाढते आणि आरोग्यही खराब होते.     * खाद्यपदार्थांवर नियंत्रण विशेष खाद्यपदार्थ फक्त अशा सणासुदीच्या दिवसातच तयार केले जातात. बऱ्याचदा आनंदाच्या या प्रसंगी मोठ्याप्रमाणात या पदार्थांचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केले जाते. त्यामुळे साहजिकच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.  *  मिठाईचा कालावधीही घ्या लक्षात  बऱ्याचदा आपण दिवाळीनिमित्त मिठाई जास्त प्रमाणात बनवितो. त्यात मिठाई दूध आणि क्रीमपासून बनलेल्या असतात. ज्या जास्त दिवस साठवण केल्याने खराब होतात. अशा मिठाईंचे सेवन केल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यासाठी उरलेल्या मिठाई आपण आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना वाटू शकतात. ज्यामुळे त्यांच्याही आनंदात वाढ निर्माण होईल.