70 कुपोषित बालकांना लोकवर्गणीतून आहार जालिंदर लांडे: कुरूलमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30
कुरूल :

70 कुपोषित बालकांना लोकवर्गणीतून आहार जालिंदर लांडे: कुरूलमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू
क रूल : बालक सदृढ असेल तरच देशाचे भविष्य उज्जवल ठरेल. त्यामुळे महिलांनी आपली स्वत:ची आणि बालकाची पूरक आहाराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कुपोषित असलेल्या 70 बालकांना लोकवर्गणीतून आहार देण्यात येणार असल्याचे जि. प. सदस्य जालिंदर लांडे यांनी सांगितले.कुरूल (ता. मोहोळ) येथील 13 अंगणवाड्यांतील कमी वजन असलेल्या बालकांच्या वजनवाढीसाठी आवश्यक असणारे आहार, औषधे व अन्य वस्तू लोकवर्गणीतून मिळवून सर्व अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या सहकार्यातून ग्राम बालविकास केंद्र उघडण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एम. बी. कोळी, सरपंच तात्या खंदारे, उपसरपंच, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल बंडगर, अंगणवाडी पर्यवेक्षिका संगीता गाडेकर, भारत जाधव, बाबासाहेब जाधव, सुशीला घोडके, लतिका वाघमोडे, शोभा कुंभार, संगीता रोडे, जयर्शी अंकुशराव, संजीवनी बाबर, अंजली माने आदी उपस्थित होते. तेरा अंगणवाड्यांतील 70 बालकांना लोकवर्गणीतून पोषक आहार देण्यात आला. या बालकांना सदृढ होईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांमार्फत देखभाल करण्यात येणार आहे, असे पर्यवेक्षिका संगीता गाडेकर यांनी सांगितले.