प्रसुत महिला व नवजात बालकही आपत्कालीन कक्षात जिल्हा रुणालयातील प्रकार : संसर्ग होण्याची भीती
By Admin | Updated: March 15, 2016 00:33 IST2016-03-15T00:33:53+5:302016-03-15T00:33:53+5:30
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्षात जागा नसल्याने प्रसूत महिलांना व नवजात बालकांना थेट आपत्कालीन कक्षात हलविले जात आहे. याच ठिकाणी अपघात व इतर घटनांचे रुग्ण दाखल असतात त्यामुळे महिला व नवजात बालकांना संसर्ग होण्याची भीती रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

प्रसुत महिला व नवजात बालकही आपत्कालीन कक्षात जिल्हा रुणालयातील प्रकार : संसर्ग होण्याची भीती
ज गाव : जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्षात जागा नसल्याने प्रसूत महिलांना व नवजात बालकांना थेट आपत्कालीन कक्षात हलविले जात आहे. याच ठिकाणी अपघात व इतर घटनांचे रुग्ण दाखल असतात त्यामुळे महिला व नवजात बालकांना संसर्ग होण्याची भीती रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक कक्षातील जागा आता कमी पडू लागल्याने अनेक वेळा एका कॉटवर दोन दोन रुग्ण असतात. त्यात प्रसूतीकक्षाचीही हीच अवस्था झाल्याने तेथील प्रसूत महिला व नवजात बालकांना थेट आपत्कालीन कक्षात हलविले जात आहे. संसर्गाची भीती...आपत्कालीन कक्षामध्ये अपघात, हाणामारी तसेच इतर घटनांमधील रुग्ण आणले जातात. यामध्ये अनेकांना जखमा असल्याने त्याचा संसर्ग येथे आणलेल्या प्रसूत महिलेला व नवजात बालकाला होण्याची दाट शक्यता असते. असे असले तरी आपत्कालीन कक्षात त्यांना ठेवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आपत्कालीन प्रसंगी कोणाला हलविणार....आपत्कालीन कक्षात प्रसूत महिला व नवजात बालक असतानाच एखादा मोठा अपघात झाला किंवा मोठी घटना घडली त्या वेळी येणार्या रुग्णांना कोठे दाखल करणार असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. ऐनवेळी प्रसूत महिला व बालाकालाही कोठे हलवू शकणार नाही.