गटारी, सार्वजनिक शौचालयाअभावी नागरिकांची कुचंबना ‘लोकमत आपल्या दारी’: चाकोतेनगर, पि?ानगर, ब्र?ानाथनगरवासीयांचे हाल

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30

सोलापूर :

Dishwarya, Public Relation, Due to the absence of public, 'Lokmat Your Opinion': Chakote Nagar, P. Nagar, Br. | गटारी, सार्वजनिक शौचालयाअभावी नागरिकांची कुचंबना ‘लोकमत आपल्या दारी’: चाकोतेनगर, पि?ानगर, ब्र?ानाथनगरवासीयांचे हाल

गटारी, सार्वजनिक शौचालयाअभावी नागरिकांची कुचंबना ‘लोकमत आपल्या दारी’: चाकोतेनगर, पि?ानगर, ब्र?ानाथनगरवासीयांचे हाल

लापूर :
सार्वजनिक गटारी नाहीत, शौचालये नाहीत, पाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पाईपलाईनच नाही, गढूळ पाण्याचा सामना अशा अनेक प्रश्नांच्या गर्तेत सापडलेल्या चाकोतेनगर, पि?ानगर, ब्र?ानाथनगरवासीयांचे प्राथमिक सेवा-सुविधांच्या बाबतीत हाल होत आहेत़ या नगराला कोणी वालीच राहिला नसल्याचा संताप नागरिकांनी यावेळी व्यक्त केला़
‘लोकमत आपल्या दारी’ मोहिमेंतर्गत लोकमतच्या चमूने विडी घरकूल परिसरात संभाजीराव शिंदे प्रशाला परिसरात वैष्णवी मारुती मंदिर, मोमीननगर, पवननगर, चाकोतेनगर, लक्ष्मीनगर, ब्र?ानाथनगर, रेणुकानगर, सुशीलअम्मानगर, कोटानगर, भारतनगर आदी नगरांमध्ये फिरुन समस्या जाणून घेतल्या़ सध्याच्या नगरसेविका या विवाहित होऊन माहेरी गेल्याने समस्या कोणत्या नगरसेवकांपुढे मांडायच्या? त्या कोण सोडवणार? असा प्रश्न विचारला गेला़
सार्वजनिक शौचालयाअभावी महिलांची कुचंबना
पि?ा आणि चाकोतेनगरमध्ये दाटीवाटीने घरे असून, लोकसंख्या मोठी आह़े या नगरात काही ठिकाणी कच्चे रस्ते झाले आहेत आणि हे रस्ते अनेक दिवसांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत़ तसेच अनेक ठिकाणचे पथदिवे बंद अवस्थेत आहेत़ सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी खासगी मोकळ्या जागांवर लघुशंका, प्रातर्विधी उरकतात़ महिलांसाठी या भागात कुठेही सार्वजनिक शौचालय नसून त्यांची मोठय़ा प्रमाणात कुचंबना होतेय़
नागरिक म्हणतात़़़
रस्ता डांबरीकरण करा
र्शीनिवास मेडिकल ते विजय ब्र?ानाथनगर-गणपती मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरणाअभावी रखडला आह़े रस्ता खराब झाला आह़े तो लवकर करावा़
- प्रभाकर र्शीगिरी

पथदिवे सुरु करा
मोमीननगर, पवननगर भागात वीज नाही़ रात्री अंधार असतो़ भुरट्या चोर्‍या वाढलेल्या आहेत़ या भागात पथदिवे सुरु करुन नागरिकांची सोय करावी़
-सतीश भरमशे?ी

काटेरी झुडपी काढा
अनेक ठिकाणी झाडीझुडपी वाढली आहेत़ मोकळ्या जागांमध्येही काटेरी झाडी वाढली आहेत़ त्यामुळे नाग, साप, पाल, विंचूचे दर्शन होत़े झाडी दूर करा़
- रियाज मोमीन

पाण्याची व्यवस्था करा
वैष्णवी मारुती देवस्थान परिसर, चाकोतेनगर परिसराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होतो़ दोन दिवसाआड पाण्याची व्यवस्था करण्याची घोषणा सत्यात आणा़
- सतीश म्हंता

गढूळ थांबवा
पाणी आठवड्यातून एकदा येत असले तरी त्याला वास येतो़ कधी-कधी फारच गढूळ पाणी येत़े त्यामुळे पोटाचे आजार जडत आहेत़ स्वच्छ पाणी पुरवाव़े
-राजू घंटा

घंटागाडीची व्यवस्था करा
पंचमूर्ती ते राजेश कोठे हॉल मार्गावर उघड्यावर कचरा टाकला जातो़ या ठिकाणी एक कंटेनर अथवा घंटागाडीची आवश्यकता आह़े पालिकेने ही व्यवस्था करावी़
- नागनाथ गुडाराम

बोअर दुरुस्ती करा
चाकोतेनगरमध्ये चार ते पाच बोअर आहेत़ नागरिकांची भिस्तही या बोअरच्या पाण्यावर आह़े परंतु बोअरदेखील नादुरुस्त आहेत़ त्यांची दुरुस्ती कोण करणाऱ?
- सुदर्शन म्हंता

कचरा उचला
चाकोतेनगर, लक्ष्मीनगर परिसरात कचरा मोठय़ा प्रमाणात साचतो़ त्यात विडी पत्त्यांचा समावेश मोठय़ा प्रमाणात आह़े परंतु हा कचरा घेऊन जायला कोणी येत नाही़
- नारायण दुभाषी

रस्ता दुरुस्त करा
ब्र?ानाथनगर ते आदर्श उर्दू मराठी विद्यालय मार्गावरचा रस्ता अत्यंत खराब झाला असून तो लवकर दुरुस्त करावा़ विद्यार्थ्यांना फार त्रास होतोय़ गैरसोय दूर करा़
- नारायण कुंटला

पि?ानगर रस्ता करा
पि?ानगर रस्ता अद्याप होऊ शकलेला नाही़ या परिसरात ज्येष्ठ नागरिक राहतात़ लहान मुले रस्त्यावर खेळतात़ खराब रस्त्याने अनेकांचे बळी घेतले आह़े रस्ता लवकर करावा़
- नरेश कुनी

Web Title: Dishwarya, Public Relation, Due to the absence of public, 'Lokmat Your Opinion': Chakote Nagar, P. Nagar, Br.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.