शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे स्क्रिझोफेनिया आजार, जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 15:24 IST

स्क्रिझोफेनिया हा एक मानसिक आजार असून कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. या आजारामध्ये रुग्णाला अनेक भास होतात.

आज वर्ल्ड स्क्रिझोफेनिया डे. स्क्रिझोफेनिया हा एक मानसिक आजार असून कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. या आजारामध्ये रुग्णाला अनेक भास होतात. त्याला असं वाटतं की त्याच्या आजूबाजूला कोणीतरी आहे. त्यांना अशा गोष्टींचा भास होतो जी त्यांच्या आजूबाजूला नाहीयेत पण तरीही ती आहेत असा हट्ट ते धरतात. त्याच्या भावना तीव्र होतात. आपल्याविरोधात कोणीतरी कटकारस्थान करत आहे. आपल्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न होत आहे असे या रुग्णाला सतत वाटत राहते. दुर्दैवाने हा आजार आयुष्यभरासाठीचा असतो पण मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने तो आजार असतानाही माणूस आपले आयुष्य सर्वसाधारणपणे जगू शकतो.

स्क्रिझोफेनियाची लक्षणंयाची लक्षणं साधारणत: २० व्या वर्षी दिसू लागतात. झोप न लागणे, चित्रविचित्र भास होणे, मुड सतत बदलत राहणे, कोणतीही भावना तीव्र असणे, चिडचिड होणे, एकलकोंडेपणा, समाजात कोणाबरोबरही मिक्स न होणे, इतरांपासून लांब राहणे. स्वत:मध्ये दैवी शक्ती असल्याचा भास होणे आणि महत्वाचे म्हणजे आपले एक वेगळेच आभासी जग निर्माण करणे व त्यात राहणे.

स्क्रिझोफेनिया होण्याची कारणंस्क्रेझोफेनिया हा अनुवांशिक असु शकतो, काहीवेळा तो सोशल डिसऑर्डरही असू शकतो. मेंदुतल्या विशिष्ट केमिकलमध्ये बदल झाल्यानेही स्क्रिझोफेनिया होऊ शकतो. जर एखाद्याच्या फॅमिली हिस्टरीमध्ये कोणाला स्क्रिझोफेनिया असेल तर त्याला स्क्रिझोफेनिया होण्याची शक्यता जास्त असते. ड्रग्जच्या सेवनामुळेही स्क्रिझोफेनिया होऊ शकतो. स्क्रिझोफेनिया झालेल्या रुग्णाचा मेंदु अभ्यासला तर त्यात विविध पद्धतीचे विचित्र बदल आढळून येतात.

स्क्रिझोफेनियाचे परीणामस्क्रिझोफेनिया झाल्यामुळे तो रुग्ण कोणतेही काम लक्षपुर्वक करू शकत नाही. अशा रुग्णांना शालेय वयात अभ्यास करतानाही अडथळे येतात. त्यांच्या एकंदर आकलनशक्तीवर परिणाम झालेला असतो. ते कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. ते समाजापासून स्वत:ला वेगळे करतात. रोजची सर्वसाधारण कामे करणे त्यांना जमत नाही. 

स्क्रिझोफेनियावरचे उपायस्क्रिझोफेनियाच्या लक्षणांची यादीच मानसोपचारतज्ज्ञांकडे असते. यावर समुपदेशन व त्यासह औषध देऊन याचा प्रभाव कमी करता येतो. रुग्ण आपले सर्वसाधारण आयुष्य जगू शकतो. मानसिक उपचारांनीच स्क्रिझोफेनियावर मात करता येते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य