शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डायटिशिअननुसार लिव्हरची सफाई करण्याचे 3 नॅचरल उपाय, कधीच होणार नाही काही समस्या! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 11:58 IST

Natural Way to Liver Detox : लिव्हर डिटॉक्स करणं म्हणजे लिव्हर साफ करणं फार महत्वाचं ठरतं. हे काम तुम्ही घरीच नॅचरल पद्धतीने करू शकता.

Natural Way to Liver Detox : लिव्हर शरीरातील सगळ्यात मोठ्या अवयवांपैकी असतं आणि शरीरातील कितीतरी कामे लिव्हरच्या माध्यमातून केली जातात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास लिव्हर मदत करतं. पण अधिक मद्यसेवन किंवा चुकीच्या पदार्थांचं सेवन केल्याने लिव्हरवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थ अडकून असतात. ज्यामुळे पुढे लिव्हर खराब होऊ शकतं. अशात लिव्हर डिटॉक्स करणं म्हणजे लिव्हर साफ करणं फार महत्वाचं ठरतं. हे काम तुम्ही घरीच नॅचरल पद्धतीने करू शकता. डायटिशिअन श्वेता शहा पांचाळ यांनी लिव्हर साफ करण्याचे 3 नॅचरल उपाय सांगितले आहेत.

पपईच्या बीया

पिकलेल्या पपईच्या बीया खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. लिव्हर साफ करण्यासाठी या बीया फार महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे यापुढे तुम्ही कधी पपई घरी आणली तर त्यातील बीया अजिबात फेकू नका. पपईच्या बीया सुकवा त्या रोस्ट करून खाऊ शकता. तसेच तुम्ही या बियांचं पावडर तयार करून सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत 30 दिवस सेवन करा. याने तुमचं लिव्हर पूर्णपणे साफ होईल. 

दिनचर्या

जर तुम्ही दिनचर्याच चुकीचं असेल तर लिव्हरवर याचा फार वाईट प्रभाव पडतो. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही सूर्य उगवण्याच्या एक तास आधी झोपेतून उठा. दुपारचं जेवण तुम्ही 12 ते 1 वाजताच्या दरम्यान करा. रात्रीचं जेवण तुम्ही 7 वाजताच्या आत केलं पाहिजे आणि 10 वाजताच्या आत तुम्ही झोपायला हवं. 

उपवास

लिव्हर हा फारच शक्तीशाली असा अवयव असतो. त्यामुळे कितीही काहीही खाल्लं तरी लिव्हर सगळं काही डायजेस्ट करतो. सतत आपण काहीना काही खात असल्याने लिव्हरला स्व:तावर काम करण्यासाठी वेळच नसतो. लिव्हर आराम मिळावा म्हणून तुम्ही आठवड्यातून निदान एक दिवस उपवास करू शकता. याने लिव्हर निरोगी आणि साफही राहील.

लिव्हरची शरीरातील कामे

शरीरातील रक्त शुद्ध करण्याची मोठी जबाबदारी लिव्हरवर असते. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं. पण या कामात लिव्हरवर खूप जास्त दबाव तयार होतो आणि हळूहळू त्याचं काम कमजोर होतं. यामुळे फॅटी लिव्हर, फेलिअर आणि कॅन्सरही होऊ शकतो. अशात रिकाम्या पोटी काही ड्रिंक्स पिऊन तुम्ही लिव्हर स्वच्छ करू शकता. ज्याला लिव्हर डिटॉक्स म्हणतात.

लिव्हर खराब होण्याचं कारण

दारूचं जास्त सेवन केल्याने लिव्हर जास्त खराब होतं असं सगळ्यांना वाटतं. हे एक कारण आहेच. पण असं अजिबात नाही की, फक्त दारू पिऊन लिव्हर खराब होतं. दारू न पिताही लिव्हर खराब होऊ शकतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य