शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या अ‍ॅसिडीटीने हैराण झाले असाल तर या पदार्थांचं सेवन करणं टाळा, नाही तर पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 15:18 IST

Acidity : वाढत्या वयासोबत तुम्ही नुकसानकारक पदार्थ खाणे कमी केले तर तुमचा फायदा होईल. नेहमी होणारी अ‍ॅसिडीटी आणि गॅसची समस्या भविष्यात होणाऱ्या गंभीर समस्येचे संकेत असू शकतात. 

Acidity : एका वयानंतर खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये केलेलं थोडं दुर्लक्ष आरोग्यासाठी महागात पडू शकतं. कधीकाळी तुम्ही चॉकलेट आणि केक भरपूर प्रमाणात खात होते, पण हे आता तुम्हाला तीस वयानंतर जास्त प्रमाणात खाणं नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे हे गरजेचं आहे की, वाढत्या वयासोबत तुम्ही नुकसानकारक पदार्थ खाणे कमी केले तर तुमचा फायदा होईल. नेहमी होणारी अ‍ॅसिडीटी आणि गॅसची समस्या भविष्यात होणाऱ्या गंभीर समस्येचे संकेत असू शकतात. 

चॉकलेट - चॉकलेट चवीला जरी चांगले वाटत असले तरी हे पोटासाठी फार नुकसानकारक ठरू शकतात. अ‍ॅसिडीटीची समस्या असणाऱ्या लोकांना चॉकलेट खाणे टाळावे. कारण यात कॅफीन आणि थियोब्रोमाइनसारखे अन्य पदार्थ असतात. याने पोटात अॅसिड तयार होतं. यात कॉफीचं फॅटही असतं. ज्याने अ‍ॅसिड तयार होतं. तसेच यात भरपूर कोको असतं, ज्यामुळेही पोटाची समस्या वाढते. 

अल्कोहोल - बीअर आणि वाइनसारख्या मादक द्रव्याने केवळ पोटच बिघडतं असं नाही तर गॅस्ट्रिक अ‍ॅसिडी भरपूर वाढतं. तसेच शरीराला डिहायड्रेशनची समस्या होते आणि शरीरात अ‍ॅसिड तयार होतं. त्यासोबतच मद्यसेवन सोडा किंवा कार्बोनेटेड पेयासोबत मिश्रित करून घेत असाल तरी सुद्धा समस्या होतात.  

कॅफीन - एका दिवसात एक कप कॉफी किंवा चहा पिणे ठीक आहे. मात्र याचं अधिक सेवन केल्याने तुम्ही अ‍ॅसिडीटीचे शिकार होऊ शकता. कारण यात भरपूर प्रमाणात कॅफीन असतं. कॅफीनच्या सेवनामुळे पोटात गॅस्ट्रिक अ‍ॅसिडचा स्त्राव वाढतो आणि अ‍ॅसिडीटी होते. तसेच कधीही रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफीचं सेवन करू नये. 

सोडा - पोटा अ‍ॅसिड तयार होण्यासाठी सोडा आणि इतर कार्बोनेटेड पेय कारणीभूत ठरतात. कार्बोनेटेडचे बुडबुडे पोटाच्या आत पसरतात. त्यामुळे वाढत्या दबावाच्या कारणाने पोटात जळजळ होऊ लागते. सोड्यामध्ये सुद्धा कॅफीन असतं, ज्यामुळे अॅसिड तयार होतं. 

मसालेदार पदार्थ - मसालेदार पदार्थांचं अधिक सेवन केल्याने आरोग्यावर वाइट परिणाम होऊ शकतो. मिरची, गरम मसाला आणि काळे मिरे हे पदार्थ नैसर्गिकपणे अ‍ॅसिडीक असतात. हे पदार्थ खाल्ल्याने अॅसिड तयाह होऊ लागतं. पण याचं सेवन कमी प्रमाणात केलं तर याचे तुम्हाला वेगवेगळे फायदे होऊ लागतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य