शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

वजन कमी करण्यापासून ते कोलेस्ट्रॉल दूर करण्यापर्यंत लिबांच्या साली होतात 'हे' फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 10:34 IST

Lemon Peel Benefits : लिंबूच्या सालीमध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर असतात. म्हणूच आज आम्ही तुम्हाला लिंबूच्या सालिबद्धलचे औषधी गुणधर्म सांगणार आहोत.

Lemon Peel Benefits : लिंबाचे आपल्या आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. भरपूर लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज लिंबूपाणी पितात. तर लिंबाच्या रसाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. जास्तीत जास्त घरांमध्ये लिबांच्या रसाचा वापर करून लिंबाची साल फेकून दिली जाते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, लिंबाच्या सालीमध्ये अनेक औषधी गुण असतात. लिंबूच्या सालीमध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर असतात. म्हणूच आज आम्ही तुम्हाला लिंबूच्या सालिबद्धलचे औषधी गुणधर्म सांगणार आहोत.

औषधी म्हणून लिबांच्या सालीचा वापर करताना केवळ पिवळी झालेली सालच वापरावी. या सालीचा लेप तयार करून शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होतात अशा ठिकाणी लावा. हा लेप लावल्यावर त्या ठिकाणी एका कापडाने हलकेसे बांधून ठेवा. दोन तासानंतर हा लेप काढून टाका.

कसा बनवाल हा लेप?

एका काचेच्या भांड्या लिंबूच्या काही साली घ्या. यात ३ ते ४ चमचे ऑलिन्ह ऑईल मिसळून काचेचे भांडे झाकनाने बंद करा. १५ दिवस या साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. काही काळ हे तेल शरीरावर तसेच ठेवा. थोड्या वेळाने पाण्याने अवयव स्वच्छ धुवून काढा.

लिंबूच्या सालीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. लिंबूची साल शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी लाभदायी असतात. आपल्याकडे लिंबूचे लोणचेही बनवले जाते. लिंबूच्या साली आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी असतात.

लिंबाच्या सालीचे इतर फायदे

वजन कमी करण्यासाठी

लिंबाच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचं तत्व आढळतं. पेक्टिन शरीराचं वजन कमी करण्यास महत्वाची भूमिका निभावतं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबाच्या सालीपासून तयार चहाचं सेवन करा.

कोलेस्ट्रॉल कमी करा

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीपासून तयार चहाचं सेवन करू शकता. लिंबाच्या सालीमध्ये आढळणाऱ्या पेक्टिनमधील हायपोकोलेस्टेरोलेमिक प्रभाव कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.

हाडं मजबूत होतात

लिंबाच्या सालीमध्ये कॅल्शिअमच प्रमाण भरपूर असतं. कॅल्शिअम हाडं मजबूत करण्यासाठी फायदेशीर असतं. शरीरात कॅल्शिअम कमी झालं तर हाडं कमजोर होऊ लागतात.

त्वचेसाठी फायदेशीर

लिंबाच्या सालीमध्ये पॉलीफेनोल्स आढळतात. ज्यात अॅंटी-एजिंग आणि अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व आढळतात. त्याशिवाय व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी सुद्धा असतात. जे त्वचेसाठी फार फायदेशीर असतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य