डायबेटिसच्या मुसक्या आवळण्यासाठी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 15:51 IST2017-06-20T15:51:42+5:302017-06-20T15:51:42+5:30
शाकाहारींना हवी चिमूटभर दालचिनीपूड आणि इतरांना एक अंडं!

डायबेटिसच्या मुसक्या आवळण्यासाठी..
- मयूर पठाडे
डायबेटिस अर्थात मधुमेह हा किती खतरनाक आणि चिवट आजार आहे हे आता प्रत्येकालाच माहीत आहे, विशेषत: ज्यांनी या आजाराचा सामना केलेला आहे किंवा करीत आहेत, त्यांना त्याची चांगलीच जाणीव आहे.
हा डायबेटिस नुसता एकटाच येत नाही, तर इतरही अनेक आजारांसाठी तो हक्काचं माहेरघर बनतो आणि त्यांनाही निमंत्रण देतो.
डायबेटिस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रत्येकाचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू असतात, पण ते यशस्वी होतीलच याची खात्री नसते. प्रत्येक जण त्यासाठी बराच आटापिटा करीत असतो, पण जे लोक अंडी खातात, खाऊ शकतात त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. अंड्याच्या सेवनामुळे डायबेटिसला कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं.
पण नुसती अंडी खाल्ली म्हणजे लगेच तुमचा डायबेटिस कंट्रोलमध्ये आला असं होत नाही, त्यसााठी काही विशिष्ट प्रक्रियेचाही अवलंब तुम्हाला करावा लागेल.
अंड्यामुळे कशी येते शुगर कंट्रोलमध्ये? काय आहे प्रक्रिया?
दालचिनीचेही अनेक उपयोग आहेत. त्यातला पहिला उपयोग म्हणजे शरीराची सूज, लठ्ठपणा कमी करण्यासाठी दालचिनीचा उपयोग होतो, पण त्याचबरोबर शरीरातील इन्सुलिनची मात्रा नियंत्रणात ठेवण्यासाठीही दालचिनीचा चांगलाच उपयोग होतो.
मात्र ही दालचिनी किती आणि कशी खायची त्याचेही एक सूत्र आहे.
दालचिनीची पावडर करायची आणि केवळ एक चिुमटभर दालचिनी आपल्या खाण्यात किंवा चहात किंवा गरम पाण्यात टाकायची आणि ते पिऊन टाकायचं.
यामुळे तुमची शुगर बऱ्यापैकी कंट्रोल होऊ शकते आणि त्यापासून आराम मिळू शकतो.