शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कोरोनात डायबिटीसच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:15 IST

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा लोकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. ओमायक्रॉन संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, तज्ज्ञांनी लोकांना लवकरात लवकर लस घेण्याचा सल्ला दिला आहे. लस घेतल्याने तुम्हाला टी-सेल रोगप्रतिकारशक्ती कुठे मिळेल, तर पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिन विभागातील श्वसनविषयक सल्लागार डॉ. विनी कंत्रू यूट्यूबवरील सेशनमध्ये म्हणाले,  “मधुमेहाच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी लागते. अशा लोकांना डॉक्टरांशी संपर्क साधणं, इन्सुलिन घेणं आणि लसीकरण करणं आवश्यक आहे.

कोविड-19 संसर्गाच्या बाबतीत, लठ्ठपणामुळेही गंभीर लक्षणं दिसू शकतात. लठ्ठपणा आणि मधुमेह यांचं मिश्रण खूप धोकादायक आहे. डॉ. कंत्रू सल्ला देतात की, "मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांनी त्यांचं वजन नियमितपणे तपासत राहावं. लठ्ठ असणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशा लोकांना कोविड-19 या गंभीर आजारात जास्त त्रास होतो. तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला कोरोनाची लागण होण्याची शक्यताही जास्त असते."

अँटिऑक्सिडंटने भरपूर असलेला आहार विषाणू किंवा संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी आहे. डॉ.कंत्रू म्हणाले, "आपण आपल्या आहारात बदाम, फळं किंवा सॅलडमधून अँटिऑक्सिडंट्सचा समावेश करू शकतो. अँटिऑक्सिडंट्स शरीराला डीएनएच्या नुकसानापासून वाचवतात."  तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, दररोज सुमारे 30 ग्रॅम बदाम खाल्ल्याने मुलांमध्ये आणि प्रौढांमधील संसर्ग आणि रोगांचा धोका कमी होतो.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdiabetesमधुमेह