शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Diabetes Tips: डायबिटीसचे रुग्ण खाऊ शकतात का हंगामी फळे? तज्ज्ञमंडळी देतात 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 13:49 IST

फळे गोड असतात आणि मधुमेहाच्या रुग्णांनी फळांपासून दूर राहावे असा सर्वसाधारण समज आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत मात्र (Health Tips for Diabetes Patients) काहीसे वेगळे आहे.

सर्व वयोगटातील लोकांना हंगामी फळे खायला आवडतात. सध्या पावसाळा सुरू असला तरी आंबा, टरबूज, खरबूज, केळी यासह सर्वच फळे बाजारात पाहायला मिळत आहेत. मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांमध्ये कोणती फळे खावीत आणि खाऊ नयेत याबाबत संभ्रम असतो. फळे गोड असतात आणि मधुमेहाच्या रुग्णांनी फळांपासून दूर राहावे असा सर्वसाधारण समज आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत मात्र (Health Tips for Diabetes Patients) काहीसे वेगळे आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?मधुमेह तज्ज्ञ डॉ.ललित कौशिक (एमडी) News 18 ला दिलेल्या माहितीत सांगतात की, मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. यामुळे त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मात्र, मधुमेहाचे रुग्ण फळे खाऊ शकत नाहीत, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना मधुमेहाच्या गंभीर अवस्थेचा त्रास आहे किंवा ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी फळे खाणे टाळावे. याशिवाय इतर रुग्ण मोसमी फळांसह बहुतांश फळे खाऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, टरबूज, खरबूज, आंबा, केळी यासह बहुतांश फळांमध्ये पोटॅशियम भरपूर असते, त्यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होते. इन्सुलिन तयार झाल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.

या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा -डॉ.ललित कौशिक म्हणतात की फळांमध्ये फ्रक्टोजचे प्रमाण असते, त्यामुळे साखरेची पातळी थेट वाढत नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांनी रात्री फळे खावीत. असे केल्याने त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र, फार पूर्वी कापलेली फळे खाणे टाळावे. फळे कापून घरी खाण्याचा प्रयत्न करा. आजकाल फळांना गोड करण्यासाठीही रसायनांचा वापर केला जात आहे. कोणतेही फळ अपेक्षेपेक्षा जास्त गोड जाणवत असेल तर ते खाणे टाळावे.

तर डॉक्टरांशी संपर्क साधा -मधुमेहाच्या रुग्णांना फळे खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर तुम्हाला मधुमेहाच्या गंभीर अवस्थेचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच फळांचे सेवन करावे. तसेच लक्षात ठेवा की, किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी फळे खाताना थोडा हात आखडता ठेवावे. फळे खाणे आपल्या आरोग्याच्या स्थितीवर देखील अवलंबून असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह