शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीसचा तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलशी आहे जवळचा संबंध, कसा? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 17:51 IST

डायबेटिसमुळे कोलेस्टेरॉलची लेव्हल कशी वाढते, या विषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.

सध्याच्या काळात सर्व वयोगटातले लोक डायबेटिस अर्थात मधुमेह (Diabetes) आणि हाय कोलेस्टेरॉलच्या (High cholesterol) समस्येमुळे त्रस्त आहेत. अर्थात यामागे अनेक कारणं आहेत. बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, बैठं काम, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि अनुवंशिकता आदी कारणांमुळे डायबेटिसची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

अनेक लोकांना डायबेटिस टाइप -2 मुळे कोलेस्टेरॉलची समस्या जाणवत आहे. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल; पण या दोन्ही आजारांचा परस्पराशी संबंध आहे. कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तात आढळणारा एक पदार्थ आहे, जो हॉर्मोन्स निर्मितीसाठी मदत करतो. जेव्हा कोलेस्टेरॉलची लेव्हल सामान्यपेक्षा जास्त असते तेव्हा ते रक्त वाहिन्यांमध्ये जमा होते आणि रक्त प्रवाहावर परिणाम करू लागते. यामुळे हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. डायबेटिसमुळे कोलेस्टेरॉलची लेव्हल कशी वाढते, या विषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.

डायबेटिस आणि कोलेस्टेरॉलचा संबंध:'वेब एमडी`च्या अहवालानुसार, डायबेटिस टाइप -2 चा सामना करत असलेल्या बहुतांश लोकांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल अर्थात एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची अर्थात एचडीएलची पातळी कमी होते. जेव्हा डायबेटिस असलेल्या रुग्णाची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा हाय कोलेस्टेरॉलची समस्या दिसू लागते. परंतु, काही वेळा ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात असतानाही कोलेस्टेरॉल वाढू शकतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लठ्ठपणा असलेल्या डायबेटिस टाइप -1 च्या रुग्णांनादेखील कोलेस्टेरॉलचा त्रास होऊ शकतो.

70 टक्के रुग्णांना आहे ही समस्या:डायबेटिसमुळे जेव्हा गुड कोलेस्टेरॉल कमी होतं आणि बॅड कोलेस्टेरॉल तसंच ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढते, तेव्हा या स्थितीला डायबेटिक डायस्लिपिडेमिया असं म्हणतात. डायबेटिस टाइप -2 असलेल्या सुमारे 70 टक्के लोकांना हा त्रास होतो. त्यातच जर ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणाबाहेर असेल तर हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असतो. ही स्थिती दूर ठेवण्यासाठी डायबेटिसच्या रुग्णांनी ब्लड शुगर लेव्हलसोबतच कोलेस्टेरॉलची तपासणी करणं गरजेचं आहे.

ही स्थिती कशी टाळायची?डायबेटिसच्या रुग्णांनी आपली ब्लड शुगर लेव्हल नेहमी नियंत्रणात ठेवावी. यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता कमी होते. या रुग्णांनी डायबेटिस आणि कोलेस्टेरॉल अशा दोन्ही गोष्टींवर एकत्रित उपचार घेणं आवश्यक आहे. उत्तम जीवनशैली, सकस आहार आणि रोज व्यायाम करून या समस्या काही प्रमाणात आटोक्यात आणल्या जाऊ शकतात. उपचारांमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नये अन्यथा हृदयविकाराची समस्या निर्माण होऊ शकते. त्यासोबत हॉर्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही वाढू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स