शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत मिठाई आणि फराळ तुमचा डायबिटीस करेल अतिगंभीर, वेळीच फॉलो करा या सोप्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 14:38 IST

मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ केले जातात आणि खाल्ले जातात. पण अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांसमोर सर्वात मोठी समस्या उभी राहते. जास्त गोड खाणे त्यांच्यासाठी घातक ठरते. दिवाळीमध्ये मधुमेही रूग्णांनी काही खास टिप्स फाॅलो करून साखर नियंत्रणात ठेवली पाहिजे.

दिवाळी हा वर्षातील मोठा सण आहे. याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. त्यासाठी अनेक दिवस आधीच तयारी सुरू होते. घर स्वच्छ करण्यापासून विविध प्रकारच्या मिठाई आणि पदार्थ बनवण्यापर्यंतची प्रक्रिया सुरू असते. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ केले जातात आणि खाल्ले जातात. पण अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांसमोर सर्वात मोठी समस्या उभी राहते. जास्त गोड खाणे त्यांच्यासाठी घातक ठरते. दिवाळीमध्ये मधुमेही रूग्णांनी काही खास टिप्स फाॅलो करून साखर नियंत्रणात ठेवली पाहिजे.

गूळ वापरातोंड गोड करण्यासाठी साखरच खावी असे नाही. त्याऐवजी तुम्ही गूळ वापरूनही काही गोष्टी तयार करू शकता. गुळापासून बनवलेले गोड पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे गूळ घालून काही मिठाई घरीच बनवा. मधुमेही रुग्ण या गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खाऊ शकतात.

शुगर फ्री मिठाईतुम्ही खीर, फिरनी किंवा इतर काही मिठाईसाठी शुगर फ्री वापरू शकता. तुम्ही स्वतःसाठी स्वतंत्रपणे काही शुगर फ्री मिठाई देखील बनवू शकता. पण बाजारातील शुगर फ्री मिठाई खाणे टाळा.

सुकामेवा आणि स्नॅक्ससणाचा आनंद फक्त मिठाईनेच घेतला पाहिजे असे नाही. या दरम्यान तुम्ही स्नॅक्स किंवा सुकामेवा खाऊन सणाचा आनंद घेऊ शकता. याशिवाय तुम्ही इतर स्नॅक्स पदार्थ खाऊ शकता.

पाणी प्यासणाच्या काळात लोक सामान्य दिवसांपेक्षा जास्त जड अन्न खातात. ते पचवण्यासाठी पाणी नीट प्यावे लागते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवा.

थोडे खाएकाच वेळी खूप काही खाण्याऐवजी दिवसभर थोडे थोडे खावे. यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जाही मिळेल.

नियमित चालणेमधुमेहाच्या रुग्णांसाठी नियमित चालणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात अति खाण्याचं संतुलन राखण्यासही मदत होईल. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी किमान एक तास तरी चालावे

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेहDiwaliदिवाळी 2021