शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

३ दिवसात लिव्हर डीटॉक्स करेल मनुक्याचं हे खास पाणी, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 10:24 IST

आपल्या चुकीच्या सवयींमुळे जसे की, जास्त तळलेले पदार्थ खाणे, एक्सरसाइज न करणे, प्रमाणापेक्षा जास्त धुम्रपान करणे आणि मद्यसेवन करणे यांमुळे लिव्हरवर प्रभाव पडतो.

लिव्हर हा शरीराच महत्वाचा अवयव आहे. ज्याने रक्त शुद्ध करणं आणि अन्न पचनास मदत होते. यातून तयार होणाऱ्या बाइल रसाने अन्न पचनाला मदत मिळते. पण आपल्या चुकीच्या सवयींमुळे जसे की, जास्त तळलेले पदार्थ खाणे, एक्सरसाइज न करणे, प्रमाणापेक्षा जास्त धुम्रपान करणे आणि मद्यसेवन करणे यांमुळे लिव्हरवर प्रभाव पडतो. जास्त दबाव पडल्याने लिव्हर योग्यप्रकारे शरीरातीव विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही. 

शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही एका खासप्रकारच्या ड्रिंकचं सेवन करू शकता. तुम्ही मनुके आणि त्याच्या पाण्याने केवळ ३ दिवसात लिव्हर स्वच्छ केलं जाऊ शकतं. महत्वाची बाब म्हणजे मनुक्याचं पाणी तयार करणं फारच सोपं आहे. चला जाणून घेऊ लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी ड्रिंक तयार करण्याची पद्धत...

कसं ठरतं फायदेशीर?

(Image Credit : steptohealth.com)

मनुक्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे हेल्थसाठी फायदेशीर असतात. मनुके एनर्जी असलेलं एक लो फॅट फूड आहे. ज्यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हे पाण्यात भिजवले तर याचे फायदे अधिक वाढतात. जर मनुक्याचं पाणी रोज सकाळी अनोशा पोटी सेवन केलं तर याने अनेकप्रकारचे फायदे होतात.

कसं करावं तयार?

हे खास ड्रिंक तयार करण्यासाठी २ कप पाणी घ्या आणि १५० ग्रॅम मनुके घ्या. डार्क रंगाचे १५० ग्रॅम मनुके चांगले धुवून घ्या. २ कप पाणी उकडायला ठेवा आणि त्यात मनुके टाका. २० मिनिटे हे उकडू द्या. आता मनुके रात्रभर याच पाण्यात राहू द्या. सकाळी तुमचं ड्रिंक तयार होईल.

कसं आणि कधी करावं सेवन?

(Image Credit : brightside.me)

सकाळी अनोशा पोटी नाश्त्याच्या अर्धा तासआधी हे पाणी सेवन करू शकता आणि त्याआधी या पाण्यातील मनुके वेगळे काढा. आता पाणी सेवन करू शकता. तसेच मनुके खाऊ शकता. केवळ ३ दिवस हा उपाय कराल तर लिव्हरमधील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढले जाती. याने लिव्हर पूर्णपणे साफ होईल. 

काय आहेत याचे फायदे?

- मनुक्याच्या पाण्यात असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सने बॉडी सेल्स हेल्दी होऊन कॅन्सरचा धोका कमी होतो.

- या पाण्यात अमिनो अ‍ॅसिड असतं जे एनर्जी देतं. याने थकवा आणि कमजोरी दूर होते. तसेच या पाण्यात व्हिटॅमिन ए, बीटा केरोटीन आणि डोळ्यांसाठी फायदेशीर फायटोन्यूट्रिएंट्स असतात. याने नजरेची कमजोरी दूर होते.

- मनुक्याच्या पाण्याने मेटाबॉलिज्म मजबूत करून फॅट बर्निंग प्रोसेज वाढते. याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

- या पाण्यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. याने तुम्हाला हाडे मजबूत करण्यास मदत मिळते.

- तसेच मनुक्यातील सॉल्युबल फायबर पोटही साफ ठेवून गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम देतं.

- मनुक्याच्या पाण्यात आयर्न, कॉपर आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतं. याने रक्ताची कमतरता दूर होऊ लाल रक्त पेशी हेल्दी होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य