शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आता भारतात मिळणार डेंग्यूची लस; ICMR ने सुरू केली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 22:15 IST

भारतात डेंग्यूमुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो.

Dengue Vaccine in India : भारतात डेंग्यूमुळे(Dengue) दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. मादी एडिस डासामुळे पसरणाऱ्या डेंग्यूवर आतापर्यंत कोणतेही प्रभावी उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, आता लवकरच भारताला डेंग्यूची लस (Dengue Vaccine) मिळणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ने ही याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. 

भारतात आतापर्यंत कोरोनापासून ते सर्व्हाइकल कँसरसारख्या आजारांची लस बनवण्यात आली आहे, पण डेंग्यूची लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना अपयश आले होते. पण, आता एक चांगली बातमी समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, भारताला लवकरच स्वदेशी बनावटीची डेंग्यूची लस मिळणार आहे. 

दोन टप्प्यातील चाचणी पूर्णडेंग्यूची लस भारतात तयार झाली असून, दोन टप्प्यांच्या चाचण्याही झाल्या आहेत. या दोन्हीच्या यशानंतर या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी केवळ ICMR द्वारेच घेतली जाते. पहिल्या चाचणीत लसीच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यात आली होती. तर, दुसऱ्या चाचणीत अँटीबॉडीज तयार करते की नाही, हे पाहिले गेले. आता तिसऱ्या चाचणीत हीडेंग्यूवर परिणामकारक आहे की नाही, याची चाचपणी केली जाईल.

कधी मिळणार?डेंग्यू लसीची फेज 3 चाचणी कधी पूर्ण होईल आणि डेंग्यू रोखण्यासाठी ही लस भारतातील लोकांना कधी उपलब्ध होईल, याची माहिती ICMR शास्त्रज्ञ डॉ. सरिता नायर यांनी दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, डेंग्यू लसीची फेज-3 चाचणी या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होणार आहे. म्हणजेच 2024 च्या जुलै-ऑगस्टपासून ही चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. ही चाचणी देशभरातील 19 ठिकाणांवर केली जाईल. ही चाचणी पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागू शकतात.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लस