शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Dengue Outbreak: देशातील 9 राज्यांत डेंग्यूचा उद्रेक; आरोग्य मंत्रालयानं पाठवली खास पथकं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 11:54 AM

Dengue outbreak: डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके  पाठवली आहेत.

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा (Corona Virus)प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत आहे. मात्र, कोरोनानंतर नवीन संकट येण्याची शक्यता आहे. कारण, देशातील काही राज्यांमध्ये डेंग्यूचा (Dengue) उद्रेक सातत्याने वाढत आहे. दरम्यान, डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके  पाठवली आहेत. डेंग्यूच्या प्रादुर्भावाशी निगडित सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी ही पथके काम करतील. 

हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाकडून तज्ज्ञांची केंद्रीय पथके पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पथकांमध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि मच्छर-जनित रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी यांचा समावेश आहे. 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सेवा महासंचालक आणि प्रधान सचिवांना (आरोग्य) पत्र पाठवण्यात आले आहे.

डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देऊन राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे, असे पत्रात म्हटले आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिवांना डेंग्यूचे जास्त रुग्ण असलेल्या राज्यांची ओळख पटवून तज्ज्ञांचे पथक पाठवण्याचे निर्देश दिले होते. आरोग्यमंत्र्यांनी या आजारावर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीतील डेंग्यू परिस्थितीचा आढावा घेतला. या वर्षी आतापर्यंत दिल्लीत डेंग्यूचे 1,530 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ऑक्टोबरमध्ये सुमारे 1,200 प्रकरणे नोंदवली गेली. जी गेल्या चार वर्षांतील या महिन्यातील सर्वाधिक संख्या आहे.

दिल्लीत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढमागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढल्याने चिंता आणखीनच वाढली आहे. गेल्या आठवड्यात डेंग्यूमुळे 5 मृत्यूची नोंद झाली आहे, त्यामुळे आता दिल्लीतील मृतांची संख्या एक वरून 6 झाली आहे. गेल्या आठवडाभरात डेंग्यूच्या नव्या रुग्णांची संख्याही 531 झाली. त्यानंतर आता एकूण रुग्णसंख्या 1537 वर गेली आहे. डेंग्यू आणि मलेरियासह चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे.

डेंग्यू म्हणजे काय?डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून पसरणारा विषाणूजन्य रोग (Viral Disease) असून, उष्णकटिबंधीय आणि अर्ध-उष्णकटिबंधीय वातावरण (Tropical & Sub-tropical Environment) असलेल्या जगभरातल्या सर्व ठिकाणी तो आढळतो. खासकरून शहरी आणि निमशहरी भागांत हा रोग मोठ्या प्रमाणावर पसरतो. हा रोग पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूला डेंग्यू व्हायरस (DENV) असं म्हणतात. डेंग्यू व्हायरसच्या संसर्गामुळे बहुतांशी वेळा सौम्य आजारपण येते. याची लक्षणे फ्लूसारखी असतात. काही वेळा मात्र यातून गुंतागुंत तयार होऊन मृत्यूही होऊ शकतो. त्याला सीव्हिअर डेंग्यू असे म्हणतात. 

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य