शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्युचे डास एका विशिष्ट वेळी चावतात आणि विशिष्ट ठिकाणीच असतात, जाणून घ्या केव्हा अन् कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 15:28 IST

वेगवेगळ्या जातींमधूनही तुम्हाला डेंग्यूची लागण चार वेळा होऊ शकते. डेंग्यू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये थेट पसरत नाही. महत्वाचं म्हणजे तुम्ही या चार विषाणूंद्वारे चारवेळा डेंग्यू संक्रमित देखील होऊ शकतो.

देशातील अनेक राज्यात डेंग्यूचे संक्रमण अधिक वाढत आहे. डेंग्यूचे संक्रमण एरिस मच्छर चावल्यामुळे पसरतो. हे मच्छर तेव्हा संक्रमित होतो जेव्हा तो डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीला चावतो. यामुळे काळजी घेणं अत्यंत महत्वाची.

डेंग्यूचे विषाणू एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट जात नाहीत. डेंग्यूचे संक्रमण DEN-1, DEN-2, DEN-3 आणि DEN-4 विषाणूंद्वारे पसरतो. या चार विषाणूंना 'सेरोटाइप' म्हणतात कारण ते प्रतिपिंडांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. वेगवेगळ्या जातींमधूनही तुम्हाला डेंग्यूची लागण चार वेळा होऊ शकते. डेंग्यू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये थेट पसरत नाही.

महत्वाचं म्हणजे तुम्ही या चार विषाणूंद्वारे चारवेळा डेंग्यू संक्रमित देखील होऊ शकतो. डेंग्यू पसरवणारे मच्छर खास करून दुपारी चावतात. खास करून सूर्योदयाच्या २ तासानंतर आणि सूर्यास्ताच्या एक तास अगोदर ती सक्रीय असतात. तसेच सर्वाधिक उजेड असलेल्या ठिकाणी रात्री देखील डेंग्यूचे मच्छर सक्रीय असतात. डेंग्यूच्या मच्छरांचा चावण्याचा धोका ऑफिस, मॉल, ऑडिटोरिअम, इनडोअर, स्टेडिअम सारख्या ठिकाणी अधिक असतो. कारण या ठिकाणी आर्टिफिशिअल लाईट्स सर्वाधिक असतात. आणि नैसर्गिक प्रकाश नसतो.

लक्षणे किती दिवस आणि कोणतीडेंग्यूचा मच्छर चावल्यानंतर तीन ते चार दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे जवळपास १० दिवस राहतात. अचानक ताप येणं, डोकं दुखणं, डोळे दुखणं, सांधे दुखणं, थकवा, अशक्तपणा, त्वचेवर लाल चट्टे आणि नाकातून रक्तस्त्राव होणं. हे डेंग्यूची लक्षणे आहेत. संपूर्ण शरीरात खूप त्रास जाणवतो. यामुळे या तापात खूप आराम करणं गरजेचं असतं.

शरीरावर होणारा परिणामशरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. एवढंच नव्हे तर याकाळात शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका. तसेच या दिवसात लिक्विड डाएट खूप महत्वाचा आहे.

आहार कसा असावा?या काळात नारळ पाणी पिणं महत्वाच आहे. तसेच पपई, किवी, डाळिंब आणि हिरव्या रंगाच्या भाज्या खाणं अधिक फायदेशीर असतात. सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहा. आणि तुमच्या प्लेटलेटची चाचणी करत राहा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स