स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:19+5:302015-02-18T00:13:19+5:30
स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच

स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच
स वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच-संशयितासह पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू : जिल्ह्यात आठ पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद(स्वाईन फ्लूचा लोगो वापरावा)नागपूर : स्वाईन फ्लूच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. आज मंगळवारी एका खासगी इस्पितळात एका रुग्णाचा तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे आज आठ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. भंडारा येथील रहिवासी भूषण सोनटक्के (३५) असे स्वाईन फ्लू संशयित मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भूषण सोनटक्के याला मेडिकलच्या अपघात विभागात तपासणीसाठी आणले, तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. स्वाईन फ्लूचे लक्षणे पाहताच त्याला स्वाईन फ्लू वॉर्डात भरती करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याच्या घशातील नमुने घेण्यात आले असलेतरी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नव्हते तर शंकरनगर चौकातील एका खासगी इस्पितळात स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. परंतु याची सविस्तर माहिती सायंकाळपर्यंत स्वाईन फ्लूचे नोडल अधिकारी डॉ. यु.बी नावाडे यांच्याकडे उपलब्ध नव्हती. मंगळवारी मेडिकलचे सहा संशयित स्वाईन फ्लू रुग्णाचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यात नागपूर येथील ४५ वर्षीय महिला तर कामठी येथील ५० वर्षीय पुरुष आहेत. स्वाईन फ्लू वॉर्डात १६ पॉझिटीव्ह तर २५ संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आज आठ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत.