हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू (बातमी जोड)
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:38+5:302015-02-15T22:36:38+5:30
- स्वाईन फ्लू वॉर्डात कनिष्ट डॉक्टर

हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू (बातमी जोड)
- ्वाईन फ्लू वॉर्डात कनिष्ट डॉक्टर रविकांत सोनी म्हणाले, स्वाईन फ्लू वॉर्डात कनिष्ट डॉक्टर राहतात. त्यांचे रुग्णाकडे लक्ष नसते. या संदर्भात विभागीय आयुक्त, अधिष्ठाता व आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. या संदर्भात मेडिसीन विभागाच्या काही डॉक्टरांशी संपर्क केला असता या विषयी बोलण्यास नकार दिला. -अर्धा तास बंद होते व्हेंटिलेटरसोनी म्हणाले, ११ फेब्रुवारी रोजी रात्री वादळी पाऊस झाला. या दरम्यान तब्बल अर्धा तास मेडिकलमध्ये वीज नव्हती. परिणामी व्हेंटिलेटरही बंद होते. ते सुरू करण्यास कुणीच हालचाल केली नाही. विशेष म्हणजे, बॅकअपची सोय असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. -खासगी प्रयोगशाळेत रक्ताची तपासणीउपचार घेत असताना वंदना सोनी यांचे रक्त तपासणीसाठी मेडिकल चौक स्थित जांभुळकर पॅथालॉजीमध्ये पाठविण्यात आले होते. याच पॅथालॉजीमध्ये तपासणी करण्याची अटही येथील डॉक्टरांनी घातली होती.