शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद डॉक्टरांनुसार ओठांवर दिसतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 14:37 IST

Diseases Symptoms On Lips : शरीरातील वेगवेगळे अवयव हे वेगवेगळ्या आजारांचे संकेत देत असतात. यातीलच एक अवयव म्हणजे आपले ओठ. ओठ बघूनही शरीरातील अनेक आजारांची माहिती घेता येते.

Diseases Symptoms On Lips : जगात वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. वेगवेगळ्या आजारांची लक्षणं वेगवेगळी असतात. काही आजारांची माहिती ही वेगवेगळ्या टेस्टच्या माध्यमातून मिळते तर काही आजार हे केवळ जीभ बघूनही समजून येतात. तसेच काही आजार हे केवळ नस बघून किंवा डोळे बघूनही जाणून घेता येतात.

शरीरातील वेगवेगळे अवयव हे वेगवेगळ्या आजारांचे संकेत देत असतात. यातीलच एक अवयव म्हणजे आपले ओठ. ओठ बघूनही शरीरातील अनेक आजारांची माहिती घेता येते. याबाबत आयुर्वेद डॉक्टर दीपक कुमार यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, ओठ कसे दिसत असले म्हणजे कोणत्या आजाराचा संकेत असू शकतो.

ओठांवर सूज

डॉक्टरांनी सांगितलं की, जर ओठांवर नेहमीच सूज राहत असेल, हा व्यक्तीच्या शरीरात काहीतरी एलर्जी असल्याचा संकेत आहे किंवा त्याला काही खाण्यामुळे रिअॅक्शन झालं असेल. पोटातही काही इन्फेक्शन असल्याने ओठांवर सूज राहते.

कोरडे ओठ

जर कुणाचे ओठ नेहमीच कोरडे राहत असतील तर याचा अर्थ होतो की, त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे किंवा त्यांना डिहायड्रेशन आहे. इतकंच नाही तर शरीरात पोषक तत्व कमी असल्यावरही ओठ कोरडे होतात. पोट जास्त खराब असल्यावरही असा संकेत दिसतो. 

पिवळे ओठ

ओठ जर पिवळे दिसत असतील तर हा एनीमियाचा संकेत असू शकतो. शरीरात ऑक्सीजन कमी झालं तर लाल रक्तपेशी कमी होतात. अशात ही समस्या होते. ओठ पिवळे किंवा पांढरे दिसत असतील तर हा शरीरात आयर्न कमी असण्याचाही संकेत असू शकतो. ज्यामुळे थकवा आणि कमजोरी जाणवते.

निळे किंवा जांभळे ओठ

निळे ओठ सियानोसिसच संकेत असू शकतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यात रक्तात ऑक्सीजन कमी होतं. तसेच ही समस्या श्वसन, हृदयरोग किंवा असंतुलित ब्लड सर्कुलेशनमुळेही होऊ शकते. अस्थमा, क्रोनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज (सीओपीडी) किंवा जन्मजात हृदयरोग अशा स्थितीत ओठ निळो किंवा जांभळ्या रंगाचे दिसतात.

लाल आणि सूजलेले ओठ

उन्हामुळे किंवा काही ब्युटी प्रोडक्ट्सच्या जळजळीमुळे ओठ लाल किंवा सूजलेले दिसू शकतात. चेइलिटिस ज्याला ओठांची सूज म्हणून ओळखलं जातं ही समस्या इन्फेक्शन, जळजळ किंवा व्हिटॅमिनची कमतरता यामुळेही होऊ शकते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य