शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोज गरम पाण्याने आंघोळ केल्यास कमी होईल हृदयरोगांचा धोका, रिसर्चमधून खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 10:25 IST

जपानमध्ये करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये 30 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता.

गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करणे नेहमीच फायदेशीर मानलं गेलं आहे. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, दररोज गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ कराल तर तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी राहतो. या रिसर्चनुसार, रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने हृदविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. 

जपानमध्ये करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये 30 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यातील 1990 आणि 2009 दरम्यानच्या आंघोळीच्या सवयींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. जर्नल हार्टचे परिणाम प्रकाशित करत अभ्यासकांनी हेही सांगितले की, रोज कोमट पाण्याने आंघोळ करणाऱ्यांना हाय ब्लड प्रेशरचा देखील धोका कमी राहतो.

काय सांगतो रिसर्च?

या रिसर्चमध्ये 30 हजार लोकांच्या आंघोळीच्या सवयींचा अभ्यास केला गेला. ज्यातून हे समजून येतं की, जे लोक गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करत होते त्यांच्यात ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. सोबतच त्यांच्या शरीरातील ब्लड प्रेशर थंड पाण्याने आंघोळ करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक संतुलित होतं. हृदय विकाराचा झटका आणि हृदयरोग टाळण्यासाठी हा एक चांगला उपाय होऊ शकतो.

वैज्ञानिकांनुसार, गरम पाण्यने आंघोळ करणे हे व्यायामाच्या प्रभावासारखं आहे. पण केवळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने हृदयरोगांवर नियंत्रण मिळवता येईल असं नाही. त्यांनी हेही सांगितले की, गरम पाण्याने आंघोळ करण्याचे काही दुष्परिणामही आहेत.

याची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी जपान पब्लिक हेल्थ सेंटरमधील 61 हजारपेक्षा अधिक मध्यम वयाच्या लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चचा अभ्यास केला. 1990 मध्ये रिसर्चच्या सुरूवातीला 43 हजार लोकांनी त्यांच्या आंघोळीच्या सवयी आणि त्यासंबंधी प्रश्नांची उत्तरे दिली. जीवनशैली, ज्यात व्यायाम, आहार, मद्यसेवन, वजन इत्यादींचा समावेश होता. तसेच सरासरी झोपेचा कालावधी, आधीचे आजार, आणि सध्या कोणत्या औषधांचा वापर करतात याचा अभ्यास केला.

वयोवृद्धांसाठी गरम पाण्याने आंघोळ करणं अधिक फायदेशीर ठरतं. याने त्यांना ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यास मदत मिळते. रिसर्चनुसार, गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदयासंबंधी आजारांचा धोका 26 टक्के होतो आणि 35 टक्के इतर आजारांचा धोका कमी होतो. 

तसेच गरम पाण्याने आंघोळ केल्याने झोप चांगली येते. चांगली झोप होणं हे आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. चांगल्या आरोग्यासाठी कमीत कमी 7 तास झोप घेणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन