शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रोज हे सोपं काम केल्यास कमी होईल हृदयरोगांचा धोका, रिसर्चमधून खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 16:17 IST

Heart disease : जपानमध्ये करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये 30 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यातील 1990 आणि 2009 दरम्यानच्या आंघोळीच्या सवयींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं.

Heart disease :  गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करणे नेहमीच फायदेशीर मानलं गेलं आहे. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, दररोज गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ कराल तर तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी राहतो. या रिसर्चनुसार, रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने हृदविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. 

जपानमध्ये करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये 30 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यातील 1990 आणि 2009 दरम्यानच्या आंघोळीच्या सवयींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. जर्नल हार्टचे परिणाम प्रकाशित करत अभ्यासकांनी हेही सांगितले की, रोज कोमट पाण्याने आंघोळ करणाऱ्यांना हाय ब्लड प्रेशरचा देखील धोका कमी राहतो.

काय सांगतो रिसर्च?

या रिसर्चमध्ये 30 हजार लोकांच्या आंघोळीच्या सवयींचा अभ्यास केला गेला. ज्यातून हे समजून येतं की, जे लोक गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करत होते त्यांच्यात ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. सोबतच त्यांच्या शरीरातील ब्लड प्रेशर थंड पाण्याने आंघोळ करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक संतुलित होतं. हृदय विकाराचा झटका आणि हृदयरोग टाळण्यासाठी हा एक चांगला उपाय होऊ शकतो.

वैज्ञानिकांनुसार, गरम पाण्यने आंघोळ करणे हे व्यायामाच्या प्रभावासारखं आहे. पण केवळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने हृदयरोगांवर नियंत्रण मिळवता येईल असं नाही. त्यांनी हेही सांगितले की, गरम पाण्याने आंघोळ करण्याचे काही दुष्परिणामही आहेत.

याची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी जपान पब्लिक हेल्थ सेंटरमधील 61 हजारपेक्षा अधिक मध्यम वयाच्या लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चचा अभ्यास केला. 1990 मध्ये रिसर्चच्या सुरूवातीला 43 हजार लोकांनी त्यांच्या आंघोळीच्या सवयी आणि त्यासंबंधी प्रश्नांची उत्तरे दिली. जीवनशैली, ज्यात व्यायाम, आहार, मद्यसेवन, वजन इत्यादींचा समावेश होता. तसेच सरासरी झोपेचा कालावधी, आधीचे आजार, आणि सध्या कोणत्या औषधांचा वापर करतात याचा अभ्यास केला.

वयोवृद्धांसाठी गरम पाण्याने आंघोळ करणं अधिक फायदेशीर ठरतं. याने त्यांना ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यास मदत मिळते. रिसर्चनुसार, गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदयासंबंधी आजारांचा धोका 26 टक्के होतो आणि 35 टक्के इतर आजारांचा धोका कमी होतो. 

तसेच गरम पाण्याने आंघोळ केल्याने झोप चांगली येते. चांगली झोप होणं हे आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. चांगल्या आरोग्यासाठी कमीत कमी 7 तास झोप घेणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य