आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार; ऑनलाइन पोर्टलवर लसीच्या अपडेट्स मिळणार

By manali.bagul | Published: September 29, 2020 05:10 PM2020-09-29T17:10:40+5:302020-09-29T17:14:20+5:30

CoronaVirus News & Latest Updates : भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. देशात कोरोनाची लस कधीपर्यंत याबाबत कोणालाही कल्पना नाही. अशा स्थितीत आरोग्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर आशेचा किरण दिसला आहे.

Covid vaccine unionhealth minister dr harshvardhan says coronavirus vaccine to launch soon in india | आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार; ऑनलाइन पोर्टलवर लसीच्या अपडेट्स मिळणार

आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार; ऑनलाइन पोर्टलवर लसीच्या अपडेट्स मिळणार

Next

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणात जगभरातील अनेक देश लसीच्या प्रतिक्षेत आहेत. रशियाने ऑगस्टमध्ये लसीचे रजिस्ट्रेशन केल्यामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते. आता भारतासह, अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. देशात कोरोनाची लस कधीपर्यंत याबाबत कोणालाही कल्पना नाही. अशा स्थितीत आरोग्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर आशेचा किरण दिसला आहे.  

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस विकसित करण्यासाठी  एक अभ्यास केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील तीन लसी या वैद्यकिय परिक्षणाच्या टप्प्यात आहेत. ज्या लसींची सध्या वैद्यकिय चाचणी सुरू आहे.  त्या लसी २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. आरोग्यमंत्र्याच्या या वक्तव्यानंतर जानेवारी ते मार्चपर्यंत देशात कोरोनाची लस लॉन्च होऊ शकते. असा अंदाज वर्तवला जात आहे. 

डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या लसीचे अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑनलाईन पोर्टलसुद्धा लॉन्च केले आहे. आता प्रत्येक व्यक्ती या ऑनलाईन पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन लसीचा विकास, चाचणी, पुढील आयोजन याबाबत माहिती मिळवू शकतो.  डॉ. हर्षवर्धन यांनी चिकित्सा अनुसंधान परिषद भवनात आयसीएमआरसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले.  वर्तमान आणि भविष्यकाळातील वैज्ञानिकांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाची लस कधी येणार, या विषयावर बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, जवळपास तीन लसीच्या वैद्यकिय चाचणीच्या यशस्वी टप्प्यात आहेत. या लसी पहिल्या पुढच्या वर्षाच्या तीन महिन्यात उपलब्ध होऊ शकतात.  

दरम्यान आयसीएमआरच्या सहयोगानं भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिन तयार करत आहे. याशिवाय झायडस कँडिला कंपनी जायकोव-डी ही कोरोनाची लस  तयार करत आहे. तर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एक्स्ट्राजेनेका यांच्या सहयोगानं मिळून सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया कोविशील्ड ही लस तयार करत आहे.  या स्वदेशी लसींचे  दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरू आहे. 

कोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयाची धोक्याची सूचना

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या औषधांच्या वापराबाबत धोक्याची सुचना दिली आहे. त्यांनी सांगितले की, सध्या ही 'इनवेस्टिगेशनल थेरेपी' असून या उपचारांच्या वापराबाबत अधिक माहिती मिळवणं सुरू आहे. एंटी व्हायरल ड्रग रेमडेसिविर आणि प्लाज्मा थेरेपीचा वापर गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जातो.

मुंबई आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे या औषधांचा वापर केला जात आहे. होते. डॉ. हर्षवर्धन यांच्या व्यतिरिक्त इतर रुग्णालयातही इन्वेस्टिगेशनल थेरपीच्या रुटीनसाठी या औषधांचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. याशिवाय किडनी, लिव्हर किंवा इतर गंभीर समस्या असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर दिल्याने धोका वाढू शकतो.

Web Title: Covid vaccine unionhealth minister dr harshvardhan says coronavirus vaccine to launch soon in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.