शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कफ सिरपचं अतिसेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, होऊ शकतो गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 17:18 IST

खोकला नसतानाही कायमस्वरूपी कफ सिरप घेतल्यानं अनेक घातक दुष्परिणाम होऊ शकतात. कफ सिरपमध्ये असे अनेक पदार्थ वापरले जातात, ज्यामुळं मेंदूला गंभीर नुकसान होऊ शकतं.

आपल्यापैकी बहुतेकजण खोकला झाल्यानंतर बेनाड्रील कफ सिरप, चेस्टन कफ सिरप, हनीटस कफ सिरप, अ‌ॅस्कोरिल कफ सिरपचं (Benadryl Cough Syrup, Cheston Cough Syrup, Honitus Cough Syrup, Ascoril Cough Syrup) सेवन करतात. जेव्हा छातीत श्लेष्मा किंवा खोकला जमा होतो तेव्हा कफ सिरप घेतल्यानंतर बरे वाटते. कफ सिरप (Cough Syrups) घेतल्यानंतर सहसा थोडीशी झोप येऊ शकते. पण ते जास्त प्रमाणात घेतल्यास जास्त झोप येऊ शकते. मात्र, हे माहिती असलेले आणि ज्यांना रात्री झोप येत नाही असे काही लोक रात्री जास्त प्रमाणात कफ सिरपचं सेवन करू लागतात. पण खोकला नसतानाही कायमस्वरूपी कफ सिरप घेतल्यानं अनेक घातक दुष्परिणाम होऊ शकतात. कफ सिरपमध्ये असे अनेक पदार्थ वापरले जातात, ज्यामुळं मेंदूला गंभीर नुकसान होऊ शकतं.

कफ सिरप कशापासून बनवलं जातंसुरुवातीला अफू, हेरॉईन, क्लोरोफॉर्म आणि मॉर्फिन यांसारखे पदार्थ कफ सिरपमध्ये वापरले जात होते. नंतर त्यांच्यावर बंदी आणल्यानंतर आणि ते नियंत्रित केले गेल्यानंतर संश्लेषण किंवा सिंथेसिस केलेले पदार्थ यात वापरले जाऊ लागले. आज, अनेक उत्तम संशोधनावर आधारित अनेक घटक कफ सिरपमध्ये वापरले जातात, जे संश्लेषित करून बनवले जातात. तरीही आजही सर्दी, खोकला, श्लेष्मासाठी जे कफ सिरप विकले जातात त्यांचे काही संभाव्य हानिकारक परिणाम होऊ शकतात. डेक्सट्रोमेथोरफान रसायन (डेक्स्ट्रोमेथोर्फन -डीएक्सएम) सध्याच्या बहुतेक खोकल्याच्या सिरपमध्ये वापरलं जातं. याशिवाय प्रोमेथाझिन-कोडीन आणि बेंझोनॅटेटपासून कफ सिरप बनवले जातात. जरी ते संश्लेषित केलेले असतात आणि खोकल्याच्या सिरपमध्ये वापरले जाते, तरीही तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की DXM आणि प्रोमेथॅझिन (promethazine) हे कोडीन ओपिओइड घटक आहेत. म्हणजेच त्यात अफूचा वापर केला जातो.

त्यामुळं नुकसान कशा प्रकारे होतंअमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग अ‍ॅब्युज (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अ‍ॅब्यूज ट्रस्टेड सोर्स) नुसार, डीएक्सएमचा हॅल्युसिनोजेनिक (मतिभ्रम किंवा भास होणं) प्रभाव आहे. त्याचा थेट परिणाम मेंदूच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होतो. मायोक्लिनिकच्या मते, जेव्हा अफूपासून बनवलेला हा कृत्रिम पदार्थ रक्तप्रवाहात पोहोचतो, तेव्हा तो मेंदूच्या पेशींच्या रिसेप्टर्सला चिकटतो. त्यामुळं वेदना थांबण्याचे संकेत मिळतात आणि बरं वाटण्याची अनुभूती येते. मात्र, याच्यामुळं लगेच बरं वाटत असलं तरी याचं प्रमाण थोडंसं जरी जास्त झालं तरी त्याच्यामुळं हृदयाचं मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळं श्वासोच्छवासाचा वेग मंदावतो. मात्र, लगेच मिळणार्‍या आनंदाच्या भावनेमुळं लोकांना त्याची सवय लागू शकते.

डॉक्टरकडे कधी जावंखोकला ही हवेतील हानिकारक पदार्थ शरीरात बाहेर टाकण्याची नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काहीवेळा खोकला आणि श्लेष्मा शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरतात. अशा स्थितीत कफ सिरपचा वापर केला जातो. पण कफ सिरपचे काही दुष्परिणाम देखील आहेत. WebMD नुसार, कफ सिरप प्यायल्यानंतर चक्कर येणं, डोकेदुखी, अस्वस्थता, भ्रम, झोप न लागणं यासारख्या तक्रारी असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कफ सिरप घेताना तुम्हाला मूड बदलणं, मतिभ्रम किंवा भास झाल्यासारखं होणं, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, हात व पाय थरथरणं आणि अशक्तपणा जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. शिवाय, त्वचेवर पुरळ, खाज किंवा कोणत्याही प्रकारची अ‌ॅलर्जी असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स