शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ZyCoV-D Vaccine: आता मुलांनाही मिळणार कोरोना लस, ‘झायकोव्ह-डी’चे एक कोटी डोस खरेदी करण्याचे केंद्राचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 17:05 IST

भारताच्या औषध नियामकाने 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठी मंजुरी दिलेली Zycov-D ही पहिलीच लस आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अहमदाबाद येथील झायडस कॅडिला कंपनीच्या 'Zycov-D' या तीन डोसच्या लसीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. याच बरोबर ही लस राष्ट्रीय अँटी-कोरोनाव्हायरस लसीकरण मोहिमेत या महिन्यात सामील होईल. यासंदर्भात अधिकृत सूत्रांनी रविवारी माहिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात विकसित करण्यात आलेल्या जगातील पहिल्या डीएनए-आधारित कोविड-19 लसीचा लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यासाठी उचलण्यात आलेल्या सुरुवातीच्या पावलांना हिरवा झेंडा दाखवला आहे, असे समजले जाते. ही लस सुरुवातीला वृद्धांना देण्यास प्राधान्य दिले जाईल.

एक कोटी डोसची ऑर्डर -भारताच्या औषध नियामकाने 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठी मंजुरी दिलेली Zycov-D ही पहिलीच लस आहे. एका आधिकृत सूत्राने सांगितल्यानुसार केंद्र सरकारने झायडस कॅडिलाला झयकोव्ह-डी लसीच्या एक कोटी डोस साठी ऑर्डर दिली आहे. या लसीची किंमत टॅक्स वगळून साधारणपणे 358 रुपये एवढी आहे.

28 दिवसांच्या अंतराने दिले जाणार तीन डोस -या किंमतीतच 93 रुपये किंमतीच्या ‘जेट एप्लीकेटर’चा खर्चही समाविष्ट आहे. याच्या सहाय्यानेच लसीचा डोस दिला जाईल. या लसीचे तीन डोस 28 दिवसांच्या गॅपने देण्यात येतील. या लसीला 20 ऑगस्टरोजी औषध नियामकची आपात्कालीन वापराची मंजुरी मिळाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस